Home latest News कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमीत्त् कृषि दिन साजरा

कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमीत्त् कृषि दिन साजरा

75

कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमीत्त् कृषि दिन साजरा

कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमीत्त् कृषि दिन साजरा

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

पाचोरा :- आज दिनांक 1जुलै 2022 रोजी माननीय माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त व दिनांक 25 जुन ते 1 जुलै दरम्यान आयोजीत कृषि संजीवनी मोहीमचा पाचोरा येथील रामदेव लॉन्स येथे समारोपाचा कार्यक्रम आयोजीत करुन मोहिमेची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कडधान्य पैदासकार डॉ सुमेरसिंग राजपुत म.फु.कृ.वि.जळगांव यांनी कडधान्य उत्पादन व त्यातील संधी या विषयावर व कृषि क्षेत्रातील यांत्रीकीकरणाचा वापर व शेतीकामात महीलांचे कष्ट कमी करणारी अवजारे या बाबत ईंजीनियर श्री वैभव सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. श्री बी.डी.जडे यांनी मका लागवडीचे प्रगत तंत्रज्ञाना बद्यल सखोल माहीती दिली,तसेच तसेच श्री किशोर पाटोळे यांनी कापुस पिकाच्या शाश्वत विकासासाठी जैविक उत्पादनाचा वापर व डॉ.मासाळ यांनी मका पिकावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आत्मा कमेटीचे श्री रमेशजी बाफणा यांनी शेती क्षेत्रातील कै.वसंतराव नाईक यांच्या योगदानाबद्यल उपस्थीतांना मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमाकरीता पाचोरा तालुक्याचे तहसीलदार श्री कैलास चावडे,गटविकास अधिकारी श्री अतुल पाटील,आत्मा कमेटीचे विजय वाणी,अभय पाटील,तुळशीदास पाटील व प्रगतशील शेतकरी श्री विठ्ठल गुंजाळ उपस्थीत होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका कृषि अधिकारी श्री आर एन जाधव यांनी केले,सदरील प्रास्ताविकात कृषि विभागाच्या योजनां, तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शनासह,आदर्श बाजार व्यवस्था ही, शेतकऱ्याचा उन्नतीचा राजमार्ग या विषयावर त्यांनी मार्गदश्रन करुन त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उमेश पाटील यांनी केले,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती पाचोरा कृषि अधिकारी श्री भालेराव , मंडळ कृषि अधिकारी ए.व्ही जाधव,एस आर मोहिते,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन भैरव व व तालुका कृषी कार्यालयाचे सर्व क्षेत्रिय अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.