छोट्या वारकऱ्यांकडून विठुरायाच्या गजरात आषाढी एकादशी साजरी

छोट्या वारकऱ्यांकडून विठुरायाच्या गजरात आषाढी एकादशी साजरी

छोट्या वारकऱ्यांकडून विठुरायाच्या गजरात आषाढी एकादशी साजरी

📰मीडिया वार्ता न्यूज📰
✍🏻संदिप जाबडे✍🏻
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
संपर्क – 8149042267

तालुक्यातील श्री शिवकृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री शंकरराव गोपाळराव महाडिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वप्रथम पालखीतील विठ्ठलाच्या प्रतिमेला पुष्पहार व पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपारिक वेशभूषा परिधान केल्या होत्या. मोठमोठ्या जल्लोषात विठूचा गजर, अभंग, ओव्याचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी बद्दल माहिती देण्यात आली. यावेळी पालखी मिरवणूक व रिंगण करून फुगडी खेळण्यात आल्या, विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याचे सादरीकरण केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here