स्वराज्य करिअर अकॅडेमी माणगांव कार्यालय आज प्रथम वर्धापन दिन माणगांव पोलीस उप अधीक्षक प्रवीण पाटील याच्या हस्ते पार पडले

स्वराज्य करिअर अकॅडेमी माणगांव कार्यालय आज प्रथम वर्धापन दिन माणगांव पोलीस उप अधीक्षक प्रवीण पाटील याच्या हस्ते पार पडले

स्वराज्य करिअर अकॅडेमी माणगांव कार्यालय आज प्रथम वर्धापन दिन माणगांव पोलीस उप अधीक्षक प्रवीण पाटील याच्या हस्ते पार पडले

✍सचिन पवार ✍
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞८०८००९२३०१📞

माणगांव:-स्वराज्य करिअर अकॅडमी माणगांव कार्यालयाचे आज प्रथम वर्धापन दिन उत्सहात साजरा करण्यात आला या अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष श्री परेश कोटकर यांनी प्रथमता माणगांव पोलीस स्टेशनचे आदरणीय श्री प्रवीण पाटील साहेब, पोलीस श्री अतुल शिंदे साहेब, पोलीस श्री अनिल रिटे साहेब, करिअर मार्गदर्शक मा श्री सचिन वाघ साहेब व मा सौ विद्या खिडबीडे मॅडम तसेच राष्ट्रीय छावा संघटनेचे कोकण विभागीय उपाध्यक्ष राजू सुतार, रायगड जिल्हा संघटक मंगेश मेस्त्री, माणगांव तालुका संघटक राजेंद्र बुरबे त्याच प्रमाणे स्वराज्य सह्याद्री ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष सचिन पवार याच्या उपस्थिती मध्ये प्रथमतः श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज याच्या प्रतिमेस दीप प्रज्वलन करून पुष्पहार घातले. त्यानंतर वरील सर्व मान्यवरचे स्वराज्य करिअर अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष श्री परेश कोटकर यांनी मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

त्यानंतर उपस्थित मान्यवर माणगांव पोलीस स्टेशनं चे उप अधीक्षक आदरणीय श्री प्रवीण पाटील साहेब यांनी अकॅडमी चे विध्यार्थी यांना मौलाचे मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनातं फिजिकल तसेच पोलीस भरती होऊन पुढील करिअर मध्ये काय काय अनुभवल पाहिजे जनतेचे रक्षण कसे केले पाहिजे, प्रथम सदरक्षणाय :खळ निग्रहणाय : नंतर परिवार काम करताना घरच विचार आलं नाही पाहिजे असे अनेक प्रकारचे विचार मा श्री पोलीस उप अधीशक प्रवीण पाटील यांनी मांडले.तसेच स्वराज्य सह्याद्री ग्रुप माणगांव व राष्टीय छावा संघटना याच्या कडून स्वराज्य करिअर अकॅडमी च्या सर्व विद्यार्थी यांना पुढील वाटचालीस अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत.या कार्यक्रमाची सांगता स्वराज्य करिअर अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष श्री परेश कोटकर यांनी सर्व मान्यवरचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here