माणगाव /इंदापूर कशेने येथे घरफोडी १,३३,५००/- रुपयांचा मुद्देमाल लंपास

माणगाव /इंदापूर कशेने येथे घरफोडी
१,३३,५००/- रुपयांचा मुद्देमाल लंपास

माणगाव /इंदापूर कशेने येथे घरफोडी १,३३,५००/- रुपयांचा मुद्देमाल लंपास

✍ दिपक दपके ✍
माणगांव शहर प्रतिनिधी
मो, 9271723603

मिळालेल्या पोलीस सूत्रानुसार माणगाव कशेने येथे घरफोडी
दिनांक १२/०७/२०२२ रात्री ०३.३० वाजण्याच्या सुमारास . विमल सुरेश कोंडे, वय ५६ वर्ष, व्यवसाय – गृहीणी, रा. कशेणे, इंदापूर ता. माणगाव, जि. रायगड
यांच्या राहत्या घरी कोणीतरी अज्ञात चोरट्याने राहत्या घराचे बंद असलेल्या खिडकीची जाळी कशानेतरी तोडुन त्याव्दारे खिडकी उघडुन घरात प्रवेश करून विमल सुरेश कोंडे, यांच्या मालकीचे १,२०,०००/- रू,एक तिन तोळे ६०० ग्रॅम वजनाचे दोन सरीचे काळया मणी गोफलेले गंथन / १०,०००/- ५००, २००, १००, रू, च्या भारतीय चलनातील नोटा / ३५००/-रु, एक एमआय कंपनीचा रेडमी गो मोबाईल निळया रंगाचा, त्याचा आयमीआय नं ८६३९८२०४१६९४९३१ त्यामध्ये जिओ कंपनीचा सिम वापरता मोबाईल, असे एकूण मुद्देमाल १,३३,५००/- रुपयांचे चोरी करून फिर्यादी यांचे संमती शिवाय लबाडीचे हेतुने स्वतःचे फायदयाकरीता घरफोडी चोरी करून चोर फरार झाला पुढील तपासी अधिकारी सपोनि / मोहीते माणगाव पोलीस ठाणे /दाखल अंमलदार – पोहवा / ९२४ तोरये माणगाव पोलीस ठाणे. /स.पो.नि.श्री. नावळे गोरेगांव पोलीस ठाणे / स.पो.नि.श्री. लहांगे माणगाव पोलीस ठाणे करीत आहे