श्रीवर्धन तक्का कोळीवाडा येथे जपली जाते १०० वर्षाची परंपरा येथे आकाडी गवरीचे केले जाते जल्लोषात स्वागत.

✍सचिन पवार ✍
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞८०८००९२३०१📞

. माणगांव :-आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर तक्का कोळीवाडा येथे आकाडी गवरिचे आगमन होत असते येथील महिला मोठ्या प्रमाणात तिचे स्वागत करतात. परिसरातील महिला माहेर वासीनी या उत्सवासाठीआवर्जून उपस्थित असतात. देवीला भाजी फळ यांची आरस करतात हंडी फोडून पारंपारिक नाच यावेळी केले जातात. काही महिला त्यांच्या अंगातही देवी येण्याचे पाहावयास मिळते. याबाबत येथील रहिवासी यांच्याशी विचारणा केली असता. शंभर वर्षांपूर्वी येथील नागरिक पदमा शेखाडकर मच्छीमारीसाठी गेले असता त्यांना आपल्या डोलीत देवीचा मुखवटा मिळाला होता. त्याने घरी आणून त्याची पूजा करून परत विसर्जन केले असता. त्यांना सतत तीन वर्ष पुन्हा मुखवटा मिळत होता. तेव्हापासून या देवीचा उत्सव आषाढी एकादशी पासून तीन दिवस साजरा केला जातो. यावेळी परिसरातील अनेक महिला उपस्थित असतात देवीच्या दर्शनसाठी अनेक नागरिक येत असतात.