Home latest News महाड तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ-प्रशासन हायअलर्ट

महाड तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ-प्रशासन हायअलर्ट

68

महाड तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ-प्रशासन हायअलर्ट

महाड तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ-प्रशासन हायअलर्ट

✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

महाड(रायगड):-हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार मंगळवारी रात्रीपासूनच महाड व पोलादपूर तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार सुरु आहे १३ जुलै मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळल्याने सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ झाली आहे. यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याआधीच प्रशासनाकडून दरड कोसळण्याचा सर्वाधिक धोका जाणवत असलेल्या अनेक कुटुंबाना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केल्यानंतर उर्वरित गावांना देखील सतर्कतेचा इशारा आपत्ती व्यवस्थापन मंडळाकडून देण्यात आला आहे यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे कोणतीही जिवितहानी होऊ नये म्हणून प्रशासन हायअलर्ट झाले असून सर्वतोपरी खबरदारी घेत असून सर्व ठिकाणी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे