चंद्रपूरात सतत च्या पावसाने चंद्रपूर झाले जलमय
मनोज एल खोब्रागडे
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर-9860020016
चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की गेल्या आठ दिवसापासून सतत च्या पावसाने व दररोजच्या पावसाने आपली हाजरी नचूकता लावल्यामुळे चंद्रपुरातील काही भागात म्हणजे विठ्ठल मंदिर वार्ड, सिस्टर कॉलनी, रहमत नगर ,भंगाराम वार्ड , महाकाली मंदिराच्या मागील भागात पूर्ण पाणी भरल्यामुळे या भागात नागरीकाचे मोठे नुकसान झाले आहे आणि अजून काही भागात नागरिकांच्या घरात पाणी भरल्या मुळे मोठे नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे प्रशासनाने काही भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे .