पिंपळगाव हरेश्वर येथील पोलिसांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, पोलिस स्टेशन परिसरात वृक्षारोपण
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
पाचोरा :- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील पोलीस स्टेशन तर्फे पोलिस स्टेशन च्या आवारात वेगवेगळ्या जातीचे सावली देणार्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन व पिंपळगाव हरेश्वर ग्राम विकास विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपणाचा कार्यक्रमात पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी
वेगवेगळ्या जातीचे 50 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे साहेब , सहायक पोलिस उप निरीक्षक अमोल पवार ,जेष्ठ पत्रकार किशोर लोहार , अरूण राजपुत, रनजित पाटील , ज्ञानेश्वर बोळखे , राकेश खोडे , पाडूरंग गोरबंज्जारा, दिपक पाटील ,अमोल पाटील , प्रमोद वाळीले, सफाई कामगार सागर साळवे ,व ग्राम रक्षक दलाचे सदस्य उपस्थित होते.
पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी आषाढी एकादशी झालेला यात्रेचे उत्तम नियोजन व सहकार्य बाबत यात्रा उत्सव समिती, ग्राम पंचायत सदस्य, ग्राम विकास विद्यालय अध्यक्ष, मुख्याध्यापक, स्टाफ तसेच पार्किंग कामी विशेष मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.