शिवसेना भवनात ” युवासेना युवती सेना”
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
✍अजय उत्तम पडघान✍
🪀🪀7350050548🪀🪀
वाशीम जिल्हा शिवसेना सहभागी,
जिल्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचेवर विश्वास दर्शविण्याकरीता वाशिम जिल्ह्यातील युवासेना तथा युवती सेनेचे शेकडो शिवसैनिक, युवासेना प्रमुख रवीभाऊ भांदुर्गे, शिवसेना माहिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ मंगलाबाई सरनाईक, वाशिम जिल्हा समन्वयक सौ जयश्रीताई देशमुख, युवती सेना जिल्हा प्रमुख सौ प्रियाताई महाजन यांच्या सक्षम नेतृत्वाखाली वाशिम जिल्हा आढावा बैठकीला शेकडो शिवसैनिक पोहोचले असून, दि. २६ रोजी वाशिम जिल्हा आढावा बैठकीमध्ये वाशिम जिल्ह्यातील सर्वच शिवसैनिक, शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले. तसेच यावेळी वाशिम जिल्ह्यातील शिव सैनिकांशी संवाद साधतांना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी, “तुम्ही तळागाळातील शिवसैनिक माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माझ्या सोबत ठामपणे असणे हिच माझी शक्ती असल्याचे सांगीतले. ” असे वृत्त भ्रमणध्वनीद्वारे, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांचेशी बोलतांना, युवती सेना जिल्हाप्रमुख सौ प्रियाताई महाजन यांनी प्रसिद्धी माध्यमाला दिले आहे. तसेच सदरच्या भेटीमध्ये मातोश्रीवर जावून त्यांनी शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे तथा रश्मीताई ठाकरे यांची सुध्दा भेट घेतली व त्यांचेशी चर्चा झाली असल्याचे सुद्धा सांगीतले.✍