Home latest News अनधिकृत पार्कींग मुळे गव्हाण फाटा ते दिघोडे वाहतूक कोंडी

अनधिकृत पार्कींग मुळे गव्हाण फाटा ते दिघोडे वाहतूक कोंडी

105

अनधिकृत पार्कींग मुळे गव्हाण फाटा ते दिघोडे वाहतूक कोंडी

संतोष आमले

पनवेल तालुका प्रतिनिधी

मो: 92204 03509

पनवेल :-उरण रस्त्यावरील ट्रेलर्स च्या अनधिकृत पार्कींग मुळे गव्हाण फाटा ते दिघोडे वाहतूक कोंडीकंटेनर गोडाउन्स च्या बाहेर उभे राहणारे ट्रेलर्स, मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी खराब झालेला रस्ता आणि रस्त्यात बंद पडलेले ट्रेलर्स या कारणामुळे सध्या पनवेल ..चिरनेर मार्गावरील गव्हाणफाटा ते दिघोडे या रस्त्यात वाहतूक कोंडी होत आहे.

रोज संध्याकाळी इथे वाहतूक कोंडी होत असून हे साडेसहा किमी अंतर जायला गाडीला अर्धा ते 1 तास एव्हडा वेळ लागतो.पेट्रोल..डिझेल वाया जाते. प्रवाशांना नियोजित ठिकाणी जायला आधिक वेळ लागतो. गेल्या काही महिन्यात या वाहतूक कोंडी मुळे काही अपघात देखील झाले आहेत. ट्रेलर्स ची अनधिकृत पार्किंग हेच वाहतूक कोंडीचे मुख्य कारण बोलले जात आहे. औद्योगिकि करणाच्या नावावर उरण चे मरण मात्र स्वस्त झाले आहे. संबंधितानी याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. कारण भविष्यात या वाहतूक कोंडीमुळे जर एखादा मोठा अपघात घडला तर येथील जनता त्यांना माफ करणार नाही.