सिरोंचा मार्गावरील अपघातात वनरक्षक जखमी स्वराज्य फाउंडेशनच्या सदस्यांच्या कार्यतत्परतेमुळे मिळाले उपचार..

सिरोंचा मार्गावरील अपघातात वनरक्षक जखमी

स्वराज्य फाउंडेशनच्या सदस्यांच्या कार्यतत्परतेमुळे मिळाले उपचार..

सिरोंचा मार्गावरील अपघातात वनरक्षक जखमी स्वराज्य फाउंडेशनच्या सदस्यांच्या कार्यतत्परतेमुळे मिळाले उपचार..

ता.प्रतिनिधी/ महेश बुरमवार.

मुलचेरा:-तालुक्यातील नंदीगाव येथे वनरक्षक पदावर कार्यरत असलेले
बाजीराव नरोटे हे ते नेहमी प्रमाणे आपले कर्तव्य बजावून शनिवार रविवार सुट्टी असल्याने आपल्या घरी आलापल्ली ला येत असताना रात्री साडे सातच्या सुमारात गाडीचे संतुलन बिघडून खाली पडले तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी स्वराज्य फाउंडेशन आल्लापल्ली येथील सदस्यांना संपर्क केला संपर्क करताच स्वराज्य फाउंडेशनचे पदाधिकारी आपले रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली व त्यांनी आलापल्ली येथील सलूजा हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले.
स्वराज्य फाउंडेशनच्या सदस्यांच्या कार्यतत्परेतेमुळे अपघात ग्रस्ताला मिळाले उपचार..या कार्यामुळे स्वराज्य फाउंडेशनच्या सदस्यांच्ये सर्वत्र कौतुक होत आहे