चोरीच्या गुन्ह्यामध्ये मदत करून बाहेर काढण्यासाठी महिला पोलिसांकडून एक लाख रुपयाची मागणी

✍सचिन पवार ✍
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞८०८००९२३०१📞
माणगांव :-रायगड जिल्ह्यातील माणगांव पोलीस स्टेशनं येथें कार्यरत असणारी महिला पोलीस नाईक कुंजन धर्मेश जाधव वय ३२वर्ष महिला पोलीस नाईक यांनी चोरीच्या गुन्हामध्ये मदत करून बाहेर काढण्यासाठी तक्रारदार याच्या कडे एक लाखाची लाचेची मागणी केल्यानी लाच लुचपत विभाग रायगड अलिबाग च्या उप अधीक्षक सुषमा सोनावणे याच्या पथकाने कारवाई केली आहे.
माणगांव पोलीस ठाणे येथील महिला पोलीस नाईक कुंजन धर्मेश जाधव हिने तक्रारदार याच्या विरोध माणगांव पोलीस ठाणे येथील दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यामध्ये मदत करून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी यांतील आरोपी लोकसेवक कुंजन जाधव यांना दिनांक २६/५/२२ रोजी पडताळणी च्या वेळी एक लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ९० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून प्रस्तुत प्रकरणी लाचेची मागणी केले बाबत गुन्हा केला आहे. यावरून आरोपी लोकसेवक कुंजन जाधव यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरु आहे.
सदर कारवाई रायगड लांचलूचपत विभागाच्या पोलीस उप अधीक्षक सुषमा सोनावणे, पोलीस हवालदार अरुण कारकरे, पोलीस हवालदार विनोद जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस नाईक जितेंद्र पाटील, पोलीस नाईक सचिन आटपाडकर, यांनी ही कारवाई केली आहे रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हाहन करण्यात येते की त्याच्या कडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्याच्या खासगी इसम (एंजेट )कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करित असल्यास तात्काळ लाच लुचपत विभागाशी संपर्क साधण्याचे आव्हान पोलीस उप अधीक्षक सुषमा सोनवणे ह्यांनी केले आहे.








