वरुड तालुक्यातील लोणी गावाला पुराचा फटका, गावात शिरले पुराचे पाणी, गावाचा संपर्क तुटला
✍ *हर्षल राजेंद्र पाटील* ✍
📰 *मोर्शी तालुका प्रतिनिधी* 📰
📱 *8600650598* 📱
*हिवरखेड ( लोणी )* *: -* दि, 9 ऑगस्ट मंगळवार ला सायंकाळी 6 वाजता च्या सुमारास वरुड ते लोणी रोडवरील सावंगा येथील लोणी धवलगिरी प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे लोणी सावंगा, करजगांव या गावांना महापुराचा फटका बसला आहे लोणी येथील गावात पुराचे पाणी शिरल्याने लोणी, सावंगा, करजगांव हि गावे पाण्याखाली आली आहे आणि यामुळे येथील गावाकऱ्यांचे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे लोणी येथे मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी गावात शिरल्याने नागरिकांच्या घरातील साहित्य व दुकानातील पूर्ण माल कोणत्याच प्रकारच्या कामाचा नाही राहला पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने सावंगा, लोणी या परिसरातील शेत जमिनी पूर्ण खरडून गेल्या तर या पुराचा फटका करजगांव येथील नागरिकांना सुद्धा बसला आहे लोणी येथील बरेचसे दुकान पाण्याखाली आली आहे तर काही नागरिकांच्या घराची पडझड सुद्धा झाली आहे.
View this post on Instagram
वरुड ते लोणी या गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने या मार्गाची वाहतूक सुद्धा बंद पडली होती सावंगा ते लोणी या गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता तसेच लोणी येथे दादाजी दरबार परिसरात संपूर्ण पाणी शिरले होते गावात आत जाणाऱ्या नागरिकांना पुराचे पाणी पूर्ण कमी होई पर्यंत थांबावे लागले तसेच लोणी गावातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.