Home latest News आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु

आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु

79

आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु

आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु

अमितकुमार त्रिपटी
अहेरी उप-जिल्हा प्रतिनिधी
मोब 9422891616

अहेरी/गडचिरोली,
दि.11: सन 1975 ते 1977 मधील आणीबाणीच्या कालावधीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान गौरव करण्यासाठी सुरू केलेली योजना दिनांक 31 जुलै 2020 रोजी बंद करण्यात आली होती. ती योजना सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळाने दिनांक 14 जुलै 2022 रोजी च्या बैठकीमध्ये निर्णय घेतला आहे . आणिबाणीच्या लढयामध्ये सहभाग घेतलेल्या व्यक्ती ज्यांनी यापूर्वी अर्ज केला नाही त्यांनी दिनांक 03 जूलै ,2018 च्या शासन निर्णयान्वये विहीत केलेल्या परिशिष्टातील शपथपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचे निर्देशित केले आहे. तसेच सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नव्याने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोंबर 2022 असा राहील त्यामुळे नवीन अर्ज या दिनांकापर्यत सादर करण्याची दक्षता अर्जदारांनी घावी असे निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी कळविले आहे.