मुबंई गोवा महामार्गावर वीर गावच्या हद्दीत दोन कारची एकमेकांना जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू तर आठ जण जखमी

49

मुबंई गोवा महामार्गावर वीर गावच्या हद्दीत दोन कारची एकमेकांना जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू तर आठ जण जखमी

सचिन पवार

माणगांव तालुका प्रतिनिधी

८०८००९२३०१

माणगांव :-मुंबई गोवा महामार्गावर आज गुरुवार दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी होंडा सिटी कार क्रमांक एम एच ४३एक्स २५३७ आणि मारुती स्विफ्ट कार क्रमांक एम एच ०६ बी एम ५७२१ या दोन कारची समोरासमोर टक्कर होऊन भीषण अपघात झाला यामध्ये होंडा सिटी कार मधील अनिकेत अशोक महाडिक वय वर्ष २७ राहणार वडघर गोरेगाव ता. माणगांव या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

होंडा सिटी मधील सौ प्रियांका अनिकेत महाडिक वय वर्ष २५, प्रतिक अशोक महाडिक वय वर्ष २०, अनिशा अशोक महाडिक वय वर्ष २० प्रिया नितीन खैरे वय वर्ष ३ हरीश विजय मोरे वय वर्ष २० सर्व राहणार वडघर गोरेगाव तर स्विफ्ट कार मधील अनिकेत सुहास दांडेकर वय वर्ष २५ सौ सुरेखा सुहास दांडेकर वय वर्ष ६० श्री सुहास दांडेकर वय वर्ष ६३ सर्व राहणार माणगाव मधील हे सर्व जखमी झाले असून त्यांच्यावर महाड येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यात आले आहे. 

सदर अपघाताचां पुढील तपास महाड पोलीस हे करित आहेत.