नगर पंचायत गोंडपिपरीचे मुख्याधिकारी म्हणूण श्री.मेश्राम साहेब रूजू व भाजपाच्या वतीने सत्कार
शरद कुकुडकार
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो.न.9518727596
काही दिवसापासून नगर पंचायत गोंडपिपरीला स्थानिक मुख्याधिकारी नव्हते व जनतेची कामे रेंगाळत होती. जनतेच्या समस्या सुटत नव्हते त्यात गोंडपिपरीचे कर्तव्यदक्ष,मनमिळावू स्वभाचे गोंडपिपरी येथिल तहसीलदार श्री. के. डी. मेश्राम साहेब यांच्याकडे मुख्याधिकारी चा पदभार देण्यात आला.
भाजपा गोंडपिपरीच्या वतिने श्री. बबनजी निकोडे भाजपा जिल्हाउपाध्यक्ष,श्री. साईनाथ मास्टे ता. कार्याध्यक्ष,श्री. गणपतजी चौधरी गुरूजी भाजपा नेते,श्री.निलेशजी पुलगमकार सरपंच हिवरा,श्री. सुहास सा. माडूरवार भाजपा जेष्ठ नेते. श्री. महेंद्रसिंग चंदेल रा.कॉंग्रेस नेते व नगर सेवक,श्री.चेतनसिह चंदेल न. पं. गटनेता उपस्थित होते.
नविन मुख्याधिकारी यांनी जनतेच्या हिताचे व पेंडिंग सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.