बाप्पाच्या आगमनाने सजला रोहा तालुका, टिटवीच्या राजाचेच णेरा नाक्यावर ढोल ताश्याच्या गजरात आगमन 

58

बाप्पाच्या आगमनाने सजला रोहा तालुका, टिटवीच्या राजाचे चणेरा नाक्यावर ढोल ताश्याच्या गजरात आगमन 

शहानवाज मुकादम 

रोहा शहर प्रतिनिधी 

मो.7972420502

रोहा: बाप्पा च्या आगमनाला सजला रोहा तालुक्यातील टिटवी गावाचा राजा सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री बापदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी रोहा चणेरा येथून सुपेगांव मुरुड शिग्राहुन टिटवी येथे ढोल ताश्याच्या गजरात बाप्पा च आगमन केले.

श्री बापदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याच २१ वर्ष या वर्षी पूर्ण होत आहे मागील दोन वर्षात कोरोना च्या महामारीने कोणतेही सण साजरे करता आले नाही मात्र यावर्षी कोरोना चा नामोनिशाण गायब झाल्याने नागरिकांना समाधान असं पाहायला मिळत आहे प्रत्येक ठिकाणी बाप्पा च्या आगमनाचे जल्लोष पाहायला मिळत आहे.असे बापदेव मंडळाचे अध्यक्ष म्हणाले.

मनोहर लक्ष्मण होगाडे उपाध्यक्ष,दामू लक्ष्मण झोरे, सचिव ,धोंडू भिकू ढेबे,संदिप झोरे,हरिश्चंद्र आवकिकर,चंद्रकांत झोडे,हरिश्चंद्र शिंदे,माजी सरपंच सारसोली झोडे व कल्याण कारी धनगर समाज रोहा तळा मुरुड व ग्रामस्थ उपस्थित आसुन चणेरा नाक्यावर जोरदार ढोल ताश्यात जल्लोष हाजारो लोकांच्या गर्दीत टिटवी च्या बाप्पा चे आगमन.

त्याच प्रमाणे इतर ग्रामस्थ व मंडळा चे अध्यक्ष श्री.मनोहर होगाडे व ग्रामस्थ यांनी प्रतिक्रिया केली.