जन्मदाता बापचं झाला वैरी; पोटच्या दोन मुलांची केली हत्या मुलांना विष पाजून बाप फरार

जन्मदाता बापचं झाला वैरी; पोटच्या दोन मुलांची केली हत्या
मुलांना विष पाजून बाप फरार

जन्मदाता बापचं झाला वैरी; पोटच्या दोन मुलांची केली हत्या मुलांना विष पाजून बाप फरार

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351

वरोडा, 2 सप्टेंबर
वरोडा शहरालगत असलेल्या बोर्डा ग्रामपंचायत येथील जन्मदात्या पित्यानेच दोन मुलांना विष पाजले आणि त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यावर बापाने घटनास्थळावरून पळ काढल्याची घटना शुक्रवारला सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान घडली.
सविस्तर वृत्त असे की संजय श्रीराम कांबळे, ( बोर्डा ) हा खाजगी शिकवणी वर्ग चालवितो, तर त्याची पत्नी ही शहरातील एका महाविद्यालयात कारकून म्हणून नोकरीला आहे. शुक्रवारला मुलगा अस्मित (8), हा शाळा सुटल्यानंतर जवळच घर असलेल्या आजीकडे गेला होता. संजयने बहाना करून त्याला घरी आणले. तर लहान मुलगी मिस्टी (3), ही नुकतीच शाळेतून आली होती. संजयने दोन्ही मुलांना आत मध्ये कोंडून त्यांना विष पाजले. तेवढ्यावरच त्याचे समाधान झाले नाही. तर त्याने दोन्ही मुलांचा गळा आवळला, आणि ते मृत पावले याची शहानिशा करून बाहेरून दाराला कुलूप लावून तेथून पळ काढला.
सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान मुलांची आई घरी आली असता तिने दाराचे कुलूप उघडले, तेव्हा दोन्ही मुले बिछान्यावर निपचीत पडली होती. त्यांच्या तोंडातून फेस येत होता, हालचाल बंद होती. तिने लगेच शेजाऱ्यांच्या मदतीने दोन्ही मुलांना वरोडा उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी दोन्ही मुलांना तपासले असता त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि त्या निर्दयी बापाचा शोध घेणे सुरू केले. त्याचा फोन सातत्याने बंद येत होता. मागील काही दिवसांपासून संजय हा आर्थिक विवंचनेत होता आणि त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याची बाब सामोर आली आहे. दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले असून वृत्त लिहेस्तोवर पोलिसांची कारवाई सुरू होती. सदर घटनेने बोर्डा येथे शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here