ब्लॅकमेल करून महिला वकिला वर अत्त्याचार

ब्लॅकमेल करून महिला वकिला वर अत्त्याचार

ब्लॅकमेल करून महिला वकिला वर अत्त्याचार

✍ त्रिशा राऊत ✍ नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो. 9096817953

नागपूर: वकीलाने ब्लॅकमेल करीत सहकारी महिला वकिलावरच वारंवार अत्याचार केल्याचे खळबळजणक प्रकरण पुढे आले आहे. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी वकीलासह त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा .कमलेश वाघदरे (46, रा. सोनेगाव) आणि त्याचा मित्र आदित्य चौधरी अशी आरोपींची नावे सांगण्यात येतात.

कमलेश आणि आकारनगर येथील रहिवासी 46 वर्षीय महिला दोघेही पेशाने वकिल आहेत. दोघेही जिल्हा व सत्र न्यायालयात सराव करतात. यामुळे एकमेकांचे परिचितही आहेत. कमलेश अनेकदा पीडितेच्या घरी जायचा. याच दरम्यान कमलेशने तिचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असा पीडितेचा आरोप आहे. 24 मार्च 2014 ते 27 मार्च 2022 दरम्यान घरी आणि कार्यालयात वारंवार अत्याचार केला.
पतीला जीवे मारण्याची धमकी
कमलेशने तिला अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचाही पीडितेचा आरोप आहे. विरोध केल्यास कमलेश जातीवाचक शिवीगाळही करायचा. कमलेशचा मित्र आदित्य यानेही पीडितेच्या घराखाली येऊन तिला शिवीगाळ केली. आदित्यने गुंड आणून तिच्या पतीला मारहाण केली आणि तिच्या मुलीला घरातून पळवून नेण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. तसेच संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कमलेश आणि आदित्यविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here