तळा तालुक्यात राष्ट्रवादीला सुरुंग संपूर्ण तारास्ते गावाचा खासदार सुनील तटकरे यांना सोडचिठ्ठी देत आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश

61

तळा तालुक्यात राष्ट्रवादीला सुरुंग संपूर्ण तारास्ते गावाचा खासदार सुनील तटकरे यांना सोडचिठ्ठी देत आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश

तळा तालुक्यात राष्ट्रवादीला सुरुंग संपूर्ण तारास्ते गावाचा खासदार सुनील तटकरे यांना सोडचिठ्ठी देत आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ तळा तालुक्यातील तारास्ते गावातील ग्रामस्थ मुंबईकर मंडळ चाकरमानी आणि महिला भगिनींनी आज रराष्ट्रवादी मधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

*यावेळी ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की राष्ट्रवादीचे नेते फक्त गाड्यांचा ताफा घेऊन विलक्षण पुरते येतात भाषणे ठोकतात आणि निघून जातात पुन्हा त्या गावांकडे डुंकून देखील पाहत नाहीत आम्ही वेळोवेळी मागणी करून देखील आमच्या गावाचा विकास झाला नाही आणि आम्ही आमदार भरतशेठ गोगावले यांच्याकडे एक वेळ फक्त विनंती वजा मागणी केली तर त्यांनी ताबडतोब आमची मागणी मान्य करून कामाला शुभारंभ करण्यास सांगितले त्यामुळे आम्ही तारास्ते ग्रामस्थ शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहोत असे मुंबईकर चाकरमानी मंडळी आणि स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थिततांसमोर सांगितले
यावेळी तारास्ते ग्रामस्थांनी मान्यवरांचे फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात शिवसेना जिंदाबाद एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है भरत शेठ आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत गावातून मिरवणूक काढली यावेळी तारास्ते ग्रामस्थांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की तुम्हाला जी जी मदत लागेल ती सर्व आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण नक्कीच करू आपण हुकूमशाहीला न जुमानता आमच्या वरती जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कदापी तडा जाऊ दिला जाणार नाही आम्ही स्टेज वरील सर्व मंडळी आपल्या सोबत कोणत्याही प्रसंगात अडीअडचणीला ठाम उभे राहू असे अभिवचन दिले

या पक्षप्रवेश समारंभावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद शेठ घोसाळकर तालुकाप्रमुख पद्मन ठसाळ संपर्कप्रमुख तळा अँड चेतन चव्हाण तळा नगर परिषदेतील नगरसेवक भास्कर गोळे नरेश सुर्वे मंगेश पोळेकर सिराज वार्पे विभाग प्रमुख आणि तळा तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते
या पक्षप्रवेशामुळे सुनील तटकरे यांच्या अस्तित्वाला सुरुंग लागले असून ही तर सुरुवात आहे आणखी खूप गावे लाईन लावून आहेत पक्षात येण्यासाठी असे गोगावले यांनी सांगितले