Airtel 4G WiFi Network Down!
चणेरा येथील अनेक गावांत एअरटेल नेटवर्क डाउन इंटरनेट स्पीडला ब्रेक,सिम विक्री द्वारे ग्राहकांची मात्र फसवणूक
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
रोहा: तालुक्यातील चणेरा विभागात सन 2021,मध्ये एअरटेल कंपनीकडून सिम कार्ड ची विक्री करने कामी गावे गावी स्टॉल लावुन सिम कार्ड विक्री करण्यात आले होते.
सदर चे सिम कार्ड विक्री होत पर्यंत सदर ची एअरटेल नेटवर्क सेवा सुरलीत होती, परंतू गेल्या सहा महिन्यांपासून ही सेवा ठप्प झालेने एअरटेल कंपनीकडून ग्राहकांची फसवणूक झालेली आहे. चणेरा विभागात अनेक गावात एअरटेल च्या नेटवर्क मध्ये अडथला येत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. नेटवर्क बंद आसल्या मुळे युजर्सना समस्यांना सामोरे जावे लागत आसुन समस्या लवकरच दुर करण्याची मागणी होत आहे. ही सेवा ठप्प आसल्याने शेकडो वापरकर्यानी मिडीया वार्ता न्युज कडे फसवणूक झालेचे सांगीतले आहे. खैरेखुर्द,तळवडे,चांडगाव व अनेक गावा व वाड्या मध्ये एअरटेल चे नेटवर्क डाउन आहे. युजर्स सातत्याने सोशल मिडीयावर वापरकर्ते म्हणतात की त्यांना मोबाईल इंटरनेट आणि कॉलींग मध्ये सेवा ठप्प आसलेने ग्राहकांचा गोधळ उडाला आहे. अनेक ठिकाणी फायबर इंटरनेट,मोबाईल नेटवर्क चे सर्व एअरटेल कनेक्शन बंद आहेत. वापर करत्यांचा दावा आहे की एअरटेल थँक्स ॲप देखील काम करीत नाही.
चणेरा नाका वगळून इतर ठिकाणी ही सेवा ठप्प आसलेने सदर कंपनीकडून ग्राहकांची फसवणूक झालेचे दिसुन येते.तरी सदर ची एअरटेल नेटवर्क ची सेवा तात्काल सुरलीत सुरु करण्याची मागणी होत आहे.अन्यथा सदर विषयी एअरटेल कंपनीकडून फसवणूक झाले बाबत तक्रार दाखल करण्यात येईल आसा मिडीया वार्ता न्युज कडे बोलताना श्री वसीम बशीर धनसे,श्री असलम इब्राहिम पित्तु,श्री शहानवाज रफिक काजी व एअरटेल नेटवर्क चे युजर्स(ग्राहक -वापरकर्ते)यांनी इशाराच दिला.