माणगाव ताम्हणी घाट अपघात प्रकरणी उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रमाणपत्र / पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते

दिपक दपके
माणगाव शहर प्रतिनिधी
मो,9271713603
माणगाव ताम्हानी पुणे घाटात 20 ऑगस्ट रोजी कार अपघात प्रकरणी साळुंके रेस्क्यू टीम यांनी महामोळाची कामगिरी केली अक्षरशः साडेसातशे फूट खोल दरीत कार कोसळली दुर्दैवाने यामध्ये तीन मृत तर तीन जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात यश आले याप्रसंगी साळुंके रेस्क्यू टीमचे रायगड मध्ये नव्हे तर महाराष्ट्रात सगळीकडे कौतुक होत आहे याप्रसंगी रायगड जिल्ह्याचे अधीक्षक कार्यालय अलिबाग येथे पोलीस अधीक्षक अशोक दुधे ,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, माणगाव डी वाय एस पी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, महाड पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश तांबे, यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी साळुंके रेस्क्यू टीमचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत साळुंखे, माणगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे, उपाध्यक्ष इमरान ढवळांणकर, व सर्व साळुंके रेस्क्यू टीम पदाधिकारी, उपस्थित होते ,








