बेपत्ता इसमाची तलावात उडी घेत आत्महत्या

बेपत्ता इसमाची तलावात उडी घेत आत्महत्या

बेपत्ता इसमाची तलावात उडी घेत आत्महत्या

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351

शहरातील रामाळा तलावात उडी घेऊन एका 41 वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. प्रकाश पोटवार असे मृतकाचे नाव असून, ते वृत्तपत्र क्षेत्रात वितरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.
प्राप्त माहितीनुसार मृतक प्रकाश पोटवार जिल्हा क्रीडा संकुल जवळ राहत होते. मागील 3 दिवसांपासून ते बेपत्ता होते. याची तक्रार मृतकाच्या परिवाराने रामनगर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान आज मंगळवारी शहरातील रामाळा तलावात त्यांचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here