Home latest News प्राथमिक उपकेंद्राची आरोग्य सेवा कोलमडली,वर्षभरापासून कर्मचा-यांचा वाणवा “पालेबारसा उपकेंद्रात प्रकार,” ...

प्राथमिक उपकेंद्राची आरोग्य सेवा कोलमडली,वर्षभरापासून कर्मचा-यांचा वाणवा “पालेबारसा उपकेंद्रात प्रकार,” ” नावापुरतेच राहिले आरोग्य केंद्र

100

प्राथमिक उपकेंद्राची आरोग्य सेवा कोलमडली,वर्षभरापासून कर्मचा-यांचा वाणवा

पालेबारसा उपकेंद्रात प्रकार,”

” नावापुरतेच राहिले आरोग्य केंद्र”

प्राथमिक उपकेंद्राची आरोग्य सेवा कोलमडली,वर्षभरापासून कर्मचा-यांचा वाणवा
“पालेबारसा उपकेंद्रात प्रकार,”
” नावापुरतेच राहिले आरोग्य केंद्र

      बाबा मेश्राम

  सावली तालुका प्रतिनिधी

  7263907273

सावली-अन्न ,वस्त्र, निवारा,सोबतच मानवी आरोग्य या मानवाच्या गरजा आहेत आणि त्या भागविण्यासाठी मानव धडपड करीत असतो,”स्वच्छ शरीरात स्वच्छ मन वास करते” या सुभोषिता प्रमाणे आरोग्य चांगले असले पाहिजे, यासाठी त मानवाच्या आरोग्य साठी शासन लाखो रुपयांचा निधी खर्च करीत असतो, वेगवेगळ्या आरोग्य योजना राबवित असतो ,असे असताना तालुक्यातील पालेबारसा येथील आरोग्य उपकेंद्रात गेल्या वर्षभरापासून कर्मचारी उपस्थित नाही त्यामुळे या उपकेंद्राची आरोग्य सेवा कोलमडली असुन नावापुरतेच उपकेंद्र आहे की,काय? असा प्रश्न उपकेंद्रात येणा-या ग्रामीण जनतेला पडलेला दिसत आहे.

   तालुक्यातील पाथरी अंतर्गत पालेबारसा उपकेंद्रात गेल्या वर्षाभरापासुन.आरोग्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती दिसून येत.आहे, या उपकेंद्रात आरोग्य सेवक, दोन सेविका असे पद असताना तिन्ही कर्मचाऱ्यांची उपकेंद्रात दांडी दिसून येतआहे. त्यामुळे पालेबारसा उपकेंद्रातील ग्रामीण जनतेला वेळेवर योग्य उपचार मिळत नसल्याने आरोग्य सेवेला मुकावे लागत आहे. 

   

      शासनाकडून आरोग्य यंत्रणेला लाखो रुपयांचा नीधी दिल्या जातो, त्यात ग्रामीण जनतेच्या आरोग्याची हमी संबंधित. कर्मचाऱ्यांना दिली आहे त्यातच बहुतेक ठिकाणी एम बी बी एस डॉक्टरांची नियुक्ती सुध्दा केल्या गेली नाही. असे असताना संबंधित उपकेंद्र कर्मचाऱ्यांविना नावापुरतेच राहिले आहे असे दिसून येते आहे. तालुक्यात ६ प्राथमिक केंद्र ,तसेच त्या अंतर्गत२५ उपकेंद्रे(आरोग्य वर्धीनी) तर सावली शहरात एक ग्रामीण रुग्णालय आहे ,त्या अंतर्गत तालुक्यातील जंनतेच्या.आरोग्याची काळजी शासन स्तरावर घेतली जाते , तालुक्यातील बहुतांश भाग ग्रामीण विभागात मोडतो ,येथील लोकांचा शेती मुख्य व्यवसाय असुन सध्या शेतीतील निंदन.सुरू आहे ,बदलत्या वातावरणानुसार या वेळेस पाऊस जास्त पडत असलेल्या तापमानात गरम ,विषम पणा दिसत असल्याने आरोग्य वर.परिणाम पडत आहेत्यात.व्हायरल.फिव्हर, हगवण., ताप, सर्दी आदी आजाराने जनता त्रस्त आहे , गावात उपकेंद्र असुनही कर्मचाऱ्यांअभावी पालेबारसा व पेंढरी , गेवरा परिसरातील जनतेला तालुक्यातील ठिकाणी यावे लागते,यामुळे आर्थिक भुर्दंड सह मानसिक स्थिती पण ढासळत जाताना दिसत आहे .

    उपकेंद्रात कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे आरोग्य सेवा ढासळली असुन रिक्त पदाचा भरणा करण्यात येऊन , गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर.तात्काळ कारवाई करण्याची मागणी परिसरातील जनता करीत आहे.

    *कोट*

  पालेबारसा येथील उपकेंद्र केवळ नावापुरते च आहे.जनतेला वेळेवर लाभ मिळत नाही. आरोग्यासाठी जनतेत उग्ररुप धारण केल्यास कोण सांभाळणार आहे.त्यामुळे मी वरिष्ठ स्तरांवर मागणी केली आहे.

  :- रमेश खेडेकर उपसरपंच, पालेबारसा.