Home latest News चंद्रपुरात तीन मजली इमारत कोसळली, एक महिला गंभीर जखमी

चंद्रपुरात तीन मजली इमारत कोसळली, एक महिला गंभीर जखमी

80

चंद्रपुरात तीन मजली इमारत कोसळली, एक महिला गंभीर जखमी, तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या महिलेला बाहेर काढण्यात यश 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर,30 सप्टेंबर: आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास स्थानिक घुटकाळा वॉर्ड, राज मंगलकार्यालयाजवळील एक तब्बल 70 वर्ष जुनी जीर्ण झालेली तीन मजली इमारत कोसळली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या इमारतीच्या मलब्याखाली एक 40 वर्षीय शाहिस्ता अय्युब खान नामक महिला ढिगाऱ्याखाली दबली.

घटनास्थळी मनपाचे अग्निशमन पथक शहर पोलिस व बचाव कार्य पथकाने आत दबलेल्या महिलेला बाहेर काढले. घटनास्थळी नागरिकांची देखील मोठी गर्दी जमा झाली होती. सविस्तर माहितीनुसार, घुटकाळा वार्डातील राज मंगल कार्यालयाजवळ पुंडलिक पाटील यांच्या मालकीची 70 वर्ष जूनी जीर्ण इमारत असून तेथे सद्ध्या दोन परिवाराचे वास्तव्य होते.

इमारतीचा भाग काही प्रमाणात खचत असल्यामुळें दोन्ही परिवारातल्या सदस्यांनी त्यांचे सामान इतरत्र हलवले. परंतु, शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आणि एकचं खडबळ उडाली. शाहिस्ता या आपला भ्रमणध्वनी घरातच विसरल्याने परत या इमारतीत गेल्या असता तेवढ्यातच ईमारत कोसळली.

मनपाच्या बचाव पथकाला घटनेची माहिती मिळताच मनपाचे बचावपथक, पोलिस पथक व महावितरण पथक घटनास्थळी पोहोचले व बचावकार्य सुरू केलें. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी 4.30 वाजता अखेर महीलेला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलें. शाहिस्ता यांना लगेच शासकीय रुग्णवाहिकेने इस्पितळात दाखल करण्यात आले.

इमारत कोसळली त्यावेळी शेजारला राहत असलेल्या नफिसा अशपाक बक्काली या 40 वर्षीय महिला त्यांच्या घराच्या अंगणात उभ्या होत्या. त्यासुद्धा मलबा अंगावर पडल्यामुळे जखमी झाल्या. त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.