Home latest News सिंदेवाहीत सेक्सटॉर्शनचा प्रकार उघडकीस 

सिंदेवाहीत सेक्सटॉर्शनचा प्रकार उघडकीस 

72

सिंदेवाहीत सेक्सटॉर्शनचा प्रकार उघडकीस 

श्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर : सिंदेवाही शहरातील एका तरुणाला अनोळखी तरुणीने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर ते दोघेही एकमेकांशी चॅटिंग करू लागले. मोबाइल क्रमांकाची देवाणघेवाण झाली. व्हॉट्सअॅपवर व्हीडिओ कॉलवर बोलणे सुरू झाले.

तरुणीच्या बोलण्याला भुलून तरुणाने प्रतिसाद देत अश्लील चाळे करून दाखविले. तिने तो कॉल रेकॉर्ड करून त्यात छेडछाड करून तरुणाला बदनाम करण्याची धमकी देऊ लागली. बदनामीच्या भीतीने या तरुणाने काही रक्कम तिला दिली. मात्र, पैशाची मागणी थांबत नसल्याने अखेर त्याने पोलिसांत धाव घेतली आणि हे प्रकरण उघडकीस आले. फेसबुक, व्हॉट्सअॅपवर व्हीडिओ कॉलवरून अनोळखी व्यक्तीचा फोन आला, तर तो स्वीकारू नका, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. सेक्सटार्शनच्या गुन्हा कसा घडतो व त्यापासून नागरिकांनी स्वतःचा बचाव कसा करावा.याबद्दल आता पोलिस प्रशासनाकडून नागरिकांना जागृत केले जात आहे.