Home latest News माता रमाई नागरी सहकारी पतसंस्थेचे ‘उदघाटन सोहळा’ मोठ्या उत्साहात संपन्न

माता रमाई नागरी सहकारी पतसंस्थेचे ‘उदघाटन सोहळा’ मोठ्या उत्साहात संपन्न

83

माता रमाई नागरी सहकारी पतसंस्थेचे ‘उदघाटन सोहळा’ मोठ्या उत्साहात संपन्न

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी

मो. नं.९८६९८६०५३०

लांजा – लांजा तालुक्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या माता रमाई नागरी सहकारी पतसंस्थेचे उदघाटन बुधवार दि.५ रोजी  धम्म चक्रप्रर्वतन दिनाचे औचित्य साधून जल्लोषात शहरातील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात हजारो सभासदांच्या उपस्थितीत पार पडले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री.अजित यशवंतराव यानी ग्रामीण भागातील सभासदाला सक्षम करण्यासाठी पतसंस्था महत्त्वाची असून त्याना कर्जाचा लाभ मिळाला पाहीजे.मात्र कर्जाची परतफेड करणे सभासदांची जबाबदार आहे. सभासदांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी संचालक मंडळाने घेतली तर माता रमाई नागरी सहकारी पतसंस्था तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात आदर्शवत ठरेल असा ठाम विश्वास जिल्हा बँक संचालक व राष्ट्रवादीचे सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी माता रमाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या उदघाटनप्रसंगी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर पतसंस्थेचे अध्यक्ष बी. आर. कांबळे., लांजा गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, लांजा नायब तहसीलदार रमेश कांबळे, सहकार अधिकारी श्रेणी १ गौतम कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक महोदय श्री महेश खामकर व खरेदी विक्री संघाचे संचालक संजय कांबळे, श्री स्वामी समर्थ नागरी सह.पत संस्थेचे संचालक व कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा अध्यक्ष संतोष कांबळे, लांजा तालुका बौद्धजन मंडळाचे अध्यक्ष संतोष जाधव, भारतीय बौद्धमहासभेचे अध्यक्ष श्रीकांत कांबळे,पतसंस्थेचे उपाध्यक्ष अशोक कांबळे, मानद सचिव चंद्रकांत संकपाळ तसेच पतसंस्थेचे सर्व संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,व माता रमाई यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर सहकार अधिकारी श्रेणी १ श्री.गौतम कांबळे यांच्या हस्ते संगणक प्रणाली द्वारे कळ  दाबून पतसंस्थेचे उदघाटन करण्यात आले  तर यावेळी कार्यक्रमाची  प्रस्तावना करताना पतसंस्थेचे उपाध्यक्ष अशोक कांबळे यांनी संस्थेच्या सभासद नोंदणीसाठी प्रवर्तक संचालकानी घेतलेली मेहनत आणि गावा गावातून प्रवर्तक मंडळावर बौद्ध बांधवानी दाखविलेला विश्वास यामुळेच संस्थेच्या निर्मितीचा घडलेल्या प्रवास यशस्वीरीत्या होऊ शकला असे प्रतिपादन करून संस्थेच्या निर्माण प्रक्रीयेचा धावता आढावा घेतला.यावेळी गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, जिल्हा बँकेचे संचालक महेश खामकर, श्री स्वामी समर्थ नागरी सह पतसंस्थेतचे संचालक श्री.संतोष कांबळे, यांनी मनोगत व्यक्त करताना पतसंस्थेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या .

अध्यक्षीय मनोगतात पतसंस्थेचे अध्यक्ष बी .आर .कांबळे यांनी पदार्पणातच १७०० पेक्षा अधिक सभासद संख्या असलेली व  कोअर बँकिंग प्रणाली द्वारे  सुरू झालेली ही तालुक्यातील पहिलीच पतसंस्था असल्याचे गौरवोद्गार  काढले तसेच पहिल्याच दिवशी १५ लाखाचे ठेवीचे उद्दिष्ट साध्य केल्याचे सांगून संस्थेच्या उदघाटना निमित्त ठेवीदारांना सर्वात जास्तीत जास्त व्याज देणारी माता रमाई स्वागत ठेव योजना संस्था सुरू करीत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. आज ही पतसंस्था निर्माण करण्याची प्रेरणा समाजप्रिय शिक्षक आयु.शिवाजी कांबळे यांची असून पतसंस्था निर्माणातील सहभागाची व समाजाची सेवा करण्याची संधी त्यामुळे मला मिळाली त्याचा अभिमान वाटतो असे त्यानी नमूद केले.

ही संस्था संचालकांची नसून प्रत्येक सभासदाने दिलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळेच सभासदानी सभासदांसाठी निर्माण केलेली सभासदांची पतसंस्था आहे.बौध्द समाजाला बचतीची सवय लावून कर्जाचे हप्ते वेळीच भरणेसाठी पवृत करून त्यांची आर्थिक पत वाढविणे हेच संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यानी अध्यक्ष पदावरून बोलताना सांगितले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  पतसंस्थेचे संचालक रघुनाथ कांबळे यांनी केले तर मानद सचिव व संस्थेचे संचालक श्री.चंद्रकांत संकपाळ यांनी धम्म चक्रप्रर्वतन दिनाच्या दिवशीही आपल्या गावातील कार्यक्रमाचे योग्य नियोजन करून वेळेत उपस्थित राहीलेल्या तालुक्यातील प्रत्येक गावातील आलेल्या बौद्ध बांधवांचे व उपस्थित व्यासपीठावरील मान्यवारांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी संस्थेचे संचालक प्रदीप पवार,विश्वजीत कांबळे,सिध्दार्थ जाधव,रमेश जाधव आणि संस्थेचे व्यवस्थापक नितीन कांबळे यानी विशेष प्रयत्न केले.