तळा तालुक्यात महिलांमध्ये चोरीची दहशत व छेडछाड करणाऱ्या अज्ञात आरोपीला अटक

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड :-तळा तालुक्यामध्ये महिलांमध्ये दहशत व छेडछाड करून अंगावरील दाग दागिने उतरवून घेऊन पोबारा करणाऱ्या अज्ञात चोरट्याला काल सायंकाळी साडेसात वाजता तळा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुरेश पवार यांनी शिताफरीने पकडून अटक केली आहे.

 

सदर इसमाने तळा तालुक्यातील चोरीवली येथील फिर्यादी महिला निर्मला चंद्रकांत जाधव वय वर्ष ६५ तालुका तळा बागाची नदी या भागात कामा निमित्त गेली असताना अज्ञात चोरटा तिथे येऊन पुढे म्हसळा बाजू कडे जाऊन परत फिरून फिर्यादी महिलेस तुला कोठे जायचे आहे.

 

 अशी चौकशी करून हाताला धरून रोडच्या बाजूला नेवून कानातील ५ग्रॅम वजनाचे २ कुंड्या व४ग्रॅम वजनाचे कान चैन जबरदस्तीने काढून घेऊन साधारणअंदाजे ४५०००/- किमतीचा दागिन्याचा पोबारा केला होता सदर घटना ४/८/२०२२ रोजी सकाळी ११.३०वा. घडली होती सदर  घटनेची नोंद करण्यात आली होती सदर महिलेचा मुलगा मुंबईहून आल्यानंतर त्यांनी काल तला पोलिस ठाणे मध्ये तक्रार नोंदवल्या नंतर इसमास अटक केल्यानंतर गु.र.तक्रार नं.९४/ २०२२ भा.द.वि‌.क.३९२ लावण्यात आला असून पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शना खाली पो.ह.७६९मनोहर पाटील पुढील तपास करीत आहेत.सदर चोरट्यांनी विविध ठिकाणी केलेल्या चोरीची कबुली दिली असून म्हसळा तालुक्यातील वरवठणे येथील निलेश कांबळे असे नांव तपासाअंती समजले या अज्ञात चोरट्यांनी दहशत निर्माण केली होती त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते सदर अज्ञात चोरट्याला सुरेश पवार पोलीस यांनी शिताफरीने पकडल्यामुळे तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here