सरदार पटेल महाविद्यालयात ‘स्पर्धा परिक्षा तयारी’ वर व्याख्यान, तर स्पर्धा परिक्षेत यश संपादन करणे सहज शक्य 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

 मो:8830857351

चंद्रपुर: स्पर्धा परिक्षेत यश संपादन करावयाचे असेल तर शालेय शिक्षण घेत असतांनाच स्पर्धा परिक्षेची तयारी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अभ्यासात सातत्य, संयम व कठोर परिश्रम घेण्याची तयारी असल्यास स्पर्धा परिक्षेत यश संपादन करणे सहज शक्य असल्याचा मौलिक मंत्र उपसंचालक, जिल्हा सिख्यिकी कार्यालय, गोदिया येथील रूपेश राऊत यांनी दिला.

चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात स्पर्धा परिक्षा तयारी’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. स्पप्नील माधमशेट्टीवार, स्पर्धा परिक्षा व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रा. संदेश बी. पाथर्डे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी रूपेश राऊत यांनी पॉवर पाईंट प्रेझेंटेशनच्या सहाय्याने स्पर्धा परिक्षा तयारी कशी करावी यावर विस्तृत माहिती देत एका वेळी एकच ध्येय ठेवणे तसेच मागील वर्षांच्या पेपर चा अभ्यास करणे, ह्या गोष्टी केल्यास स्पर्धा परिक्षेत यश संपादन केल्या जाऊ शकते असे त्यांनी विशेषत्वाने नमुद केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी रूपेश राऊत यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या शंकांचे निरसन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्रा. संदेश बी पाथर्डे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी महाविद्यालयाचे डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार यांनी पाण्याच्या रासायनिक सूत्राचे उदाहरण देवून जीवनातील एका संधीसाठी दुप्पट ‘हार्ड वर्क’ केल्यास यश संपादन करता येवू शकते असे नमूद केले.

यावेळी अध्यक्षीय भाषणातून बोलताना प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी त्यांचे ध्येय निश्चित करून वाटचाल करायला पाहिजे. त्यादृष्टीने महाविद्यालय अशा प्रकारच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात नेहमीच अग्रसेर असते. तेव्हा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील स्पर्धा परिक्षा व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन करत प्रचंड मेहनतीच्या बळावर यश संपादन करणे सहज शक्य असल्याचे मत मांडले.

या कार्यक्रमाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधा पोटदुखे, कार्यकारी अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, माजी आमदार, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत, माजी कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, सदस्य सगुणा तलांडी, राकेश पटेल, एस. के. रमजान आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी उपक्रमाशी निगडीत सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. सपना वेगीनवार, तर आभार डॉ. नागसेन शंभरकर यांनी केले. कार्यकमाच्या यशस्वीततेसाठी डॉ. प्रकाश बोरकर, डॉ. प्रफल वैद्य, प्रा. सुनील चिकटे, डॉ. संदीप गुडेलीवार, प्रा. संतोष शिंदे. प्रा. गितेश बुरांडे, प्रा. आदील शेख, गुरुदास शेंडे, राजेश इंगोले, सचिन देशमुख, श्रीमती बीना दानव, प्रशांत मडावी आदींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here