Home latest News स्नेहसंमेलन माजळ बौध्द विकास मंडळाचे मोठ्या उत्साहात संपन्न

स्नेहसंमेलन माजळ बौध्द विकास मंडळाचे मोठ्या उत्साहात संपन्न

80

स्नेहसंमेलन माजळ बौध्द विकास मंडळाचे मोठ्या उत्साहात संपन्न

स्नेहसंमेलन माजळ बौध्द विकास मंडळाचे मोठ्या उत्साहात संपन्न

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०

मुंबई – माजळ बौध्द विकास मंडळ (रजि) मुंबई/ग्रामीण यांच्या विद्यमाने ६६वा धम्मचक्र प्रवर्तक दिनानिमित्त आणि स्नेहसंमेलन सोहळा ०८ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी पाच ते नऊ वेळेत शिरोडकर(मिनी)हॉल परेळ मुंबई येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुध्द वंदना घेण्यात आली. प्रमुख अतिथी डॉ. संजय मांजलकर,मा.बबन कांबळे (अध्यक्ष – माता रमाई नागरी सहकारी पतसंस्था लांजा), प्रमुख मार्गदर्शन प्रा.विजय मोहिते सर (सिद्धार्थ कॉलेज)यांनी भगवान बुध्द धम्म, आणि बुध्द विहार या विषयावर भाषणात बुध्द धम्म आपल्या मुलांवर महापुरुषांच्या विचार त्यांच्या मनावर रुजावे म्हणून पालकांनी जास्त प्रमाणात मुलांना प्रबोधन करावे,मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावे तसेच समाजातील सर्व व्यक्तीने व्यसन आणि अंधश्रद्धा यांच्या पासून दूर राहावे व वैज्ञानिक दृष्टीकोन आचरण करावे असे मार्गदर्शन केले.

सदर मंडळाचे अध्यक्ष मा.मनोहर पांडुरंग कांबळे यांनी बुद्ध विहार समितीच्या कार्यकरणीची नावे जाहीर करून पुढील वाटचालीस खूप खूप सदिच्छा व्यक्त केली व आपण सर्व मिळून विहार लवकरच लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया असे धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त सभागृहात मत व्यक्त केले.

तसेच बुध्द विहार समितीचे अध्यक्ष मा.बबन कांबळे यांनी भाषणांतमध्ये आर्थिक नियोजनाविषयी परिस्थितीवर भाष्य केले आणि मुंबई व ग्रामीण मंडळाशी सतत संपर्क साधून एकमेकांशी संवाद करत राहणे काळाची गरज आहे असे अनेक विषयावर बोलून आपले मत व्यक्त केले.

जेष्ठ मंडळी, आजी-माजी कार्यकर्ते जास्त प्रमाणात महिलांही उपस्थित होते या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.या सांस्कृतिक कार्यक्रमात लहान बालकांनी सहभाग घेऊनआपल्या कलेची उत्तम सादरीकरण केले. यावेळी समाजातील माध्यमिक व उच्च माध्यमिक पदवी व इतर पदवीधर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मानित मंडळाच्या वतीने करण्यात आले.तसेच मंडळाच्या वतीने भोजनाची व्यवस्था केली होती. कार्यक्रमाचे सभाध्यक्ष मनोहर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले तसेच सूत्रसंचालन मंडळाचे सरचिटणीस विरसेन मांजलकर यांनी उत्कृष्टरीत्या केले.