Home latest News यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांना अभिवादन

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांना अभिवादन

64

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांना अभिवादन

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांना अभिवादन

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

चंद्रपूर, 21 ऑक्टोंबर
क्रांतीवीर शहिद बाबूराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या १६४ व्या शहिद दिनानिमित्त शुक्रवारी 21 ऑक्टोंबर रोजी जिल्हा कारागृहातील शहिद स्मारक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहिद बाबूराव शेडमाके यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. शहिद विर बाबूराव शेडमाके यांची पुण्यतिथी शहिद दिन म्हणून साजरी केली जाते. या वर्षीसुद्धा समाज बांधवांच्या वतीने शहीद दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमीत्य जिल्हा कारागृह येथील त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करुन आदरांजली अर्पण करण्यात आली. शहिद क्रांतिवीर बाबुरावजी शेडमाके यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी जिल्हा कारागृहाच्या परिरात जमलेल्या समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मसाला भात व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी असंख्य समाज बाधवांनी याचा लाभ घेतला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, महिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगावकर, सिध्दार्थ मेश्राम, संगीता येरमे, बंडु पेंदाम, सावन उईक, रवि मेश्राम, दिवाकर मेश्राम, सुनिल मेश्राम, साईनाथ मडावी, कार्तिक कोडापे, रमेश उईके, सविता दंडारे, आशा देशमुख, विश्वजित शाहा, हेरमन जोसेफ, तापोष डे, देवा कुंटा, कल्पना शिंदे, किशोर बोलमवार, वैशाली मद्दीवार कल्पना शिंदे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाच्या इतर कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.