घुग्घुस शहरातून सोळा वर्षीय बालक बेपत्ता

घुग्घुस शहरातून सोळा वर्षीय बालक बेपत्ता

घुग्घुस शहरातून सोळा वर्षीय बालक बेपत्ता

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

घुग्घुस : 14 नोव्हेंबर
घुग्घुस शहरातील एक 16 वर्षीय बालक रविवारपासून बेपत्ता झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली.
साहिल नंदकिशोर चतुरकर (रा. घुग्घुस) हा इयत्ता 10 व्या वर्गात शिकणारा बालक रविवारी, दुपारी 2 वाजताच्या सुमारास शिकवणी वर्गासाठी जातो म्हणून घरुन गेला होता. त्यानंतर घुग्घुस बसस्थानक येथून तो बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबियांनी इतरत्र शोध घेतला परंतु त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी रविवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घुग्घुस पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. हा बालक कुणाला आढळल्यास सहायक पोलिस निरीक्षक मेघा गोखरे व नापोशी मनोज धकाते यांना कळवावे, असे आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात आले आहे. पोलिसांनी बेपत्ता बालकाचा शोध घेण्यासाठी पथक पाठविले आहे. पुढील तपास घुग्घुस पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here