रोहा कोलाड मार्गांवर स्कूल व्हॅन, रिक्षा व मिनिडोरमधून प्रवाशी आणि विद्यार्थ्यांची ओव्हरलोड वाहतूक, आरटीओकडे तक्रार दाखल

48

रोहा कोलाड मार्गांवर स्कूल व्हॅन, रिक्षा व मिनिडोरमधून प्रवाशी आणि विद्यार्थ्यांची ओव्हरलोड वाहतूक, आरटीओकडे तक्रार दाखल

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड :-रोहा तालुक्यातील रोहा व कोलाड मार्गांवरून येणाऱ्या जाणाऱ्या शालेय स्कूल व्हॅन तीन आसनी रिक्षा व मिनिडोर मध्ये श्रमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आणि प्रवाशी मोठया प्रमाणात वाहतूक होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे येथे वाहतुकीच्या नियमाचे मोठया प्रमाणात उलंघन होत असल्याचे येथे स्कूल व्हॅनमध्ये अपघात होऊन लहान मुलाना गंभीर दुःखापत झाल्याचे प्रकार घडले आहे.हे जर का असेच चालू राहिले तर भविष्यात अनेक प्रकारचे अपघात होणार तसेच रोहा कोलाड मार्गावरील अनेक मिनिडोर रिक्षाचे फिटनेस आणि परमिट मुदत संपल्याचे दिसून आलेले आहे. शाळेतील मुलाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचे विमा हे बोगस असल्याचे निर्दनास आले आहे.

सदर मिळालेल्या माहिती नुसार सदरची वाहने ही वेगमर्यादाचा उलंघन करून चालवताना दिसतात गाडी पासीग करते वेळी आर्थिक व्यवहार करून गाड्या पासिंग करून घेतात पण भविष्यात अपघात झाल्यास सदर वाहणावर काढलेला विमा हा बोगस असल्यास त्यावर कोणत्याही प्रकारचा नुकसान भरपाई मिळत नाही यावर आला घालण्यासाठी रोहा येथील आमचे पत्रकार बधू त्याच प्रमाणे माहितीचा अधिकार कार्यकर्ते रोहा तालुका अध्यक्ष किरण मोरे यांनी रिक्षा, मिनिडोर तसेच स्कूल व्हॅन याच्यावर कारवाई करावी त्याच प्रमाणे त्या गाड्याचे कागदोपत्री याची जातपडतंलनी करावी याकरिता प्रादेशिक परिवहन पेण याच्याकडे तक्रार दाखल केली आहे.