माणगांव येथून १६ वर्षांच्या मुलीचे अपहरण; पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल

संतोष मोरे

इंदापूर विभाग प्रतिनिधी 

मो:7276143020

इंदापूर : माणगांव येथून अपहरण झालेल्या मुलीचा तिचे नातेवाईक व इतर ठिकाणी शोध घेऊन ती सापडली नसल्याने काल दि.१६/११/२०२२ रोजी वेळ:८.२७ वा. सुमारास पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 

     सदर दि.१५/११/२०२२ रोजी दुपारी. ३.३० वा. चे सुमारास क्रांती नगर ब्रिज माणगांव येथून वय १६ वर्षीय मुलगी उज्वला गोविंद पवार रा. साईनगर ता.माणगांव, मूळ रा. वांजळोशी आदिवासी वाडी ता.तळा हिला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी श्री.गोविंद पांडुरंग पवार वय 34 वर्ष नोकरी शिक्षक रा. साई नगर ता.माणगांव यांनी घडलेला सर्व प्रकार पोलीस अधिकाऱ्यांच्या सक्षम कथन केला. त्यांच्या फिर्यादी वरून पोलिसात अज्ञात इसमा विरोधात अपहरण केल्याचा दि.१६/११/२०२२रोजी.८.३०वा. माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ.गु.रजि.नं. ३३५/२०२२

भा. द. वि.स. कलम ३६२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. प्रसंगी मुलीचे वर्णन अंगाने सडपातळ,उंची ४फूट, रंग सावळा, अंगात ऑरेंज कलरचा टी शर्ट आर्मी रंगाची पँन्ट नाकात सोन्याची चमकी पायात काळ्या रंगाची सँडल असे वर्णन दिले. व्हिजिट पो.नि.श्री.पाटील साहेब, दाखल अंमलदार: म पो ना/१४२

ओमले माणगांव पोलीस, तपास अंमलदार: पोह/१०५८ पवार माणगांव पोलीस, यांच्या निग्रहणीत या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here