उत्तर प्रदेशमध्ये 13 वर्षाच्या मुलाने केला 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

उत्तर प्रदेश:- मध्ये एका 13 वर्षाच्या मुलाने 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील महोबा येथे घडली आहे. या प्रकरणी त्या मुलाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची रिमांड होममध्ये रवानगी करण्यात आली आहे.

महोबा गावात सदर मुलगी व मुलगा शेजारी शेजारी राहतात. शनिवारी सकाळी मुलगी तिच्या घराबाहेर खेळत असताना तो मुलगा तेथे आला. त्याने तिला खेळायला जाऊया असे सांगत एका निर्जनस्थळी नेले व तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिला तेथेच टाकून पळून गेला. दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या मुलीने तिच्या आई वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर त्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मुलाला चित्रकूट येथील रिमांड होम मध्ये पाठविण्यात आले आहे. तर मुलीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here