Home latest News उद्योजक: डॉ. संजयजी सोनावणे यांनी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संतोष मोरे यांना उपचारासाठी...

उद्योजक: डॉ. संजयजी सोनावणे यांनी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संतोष मोरे यांना उपचारासाठी केली आर्थिक मदत

76

उद्योजक: डॉ. संजयजी सोनावणे यांनी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संतोष मोरे यांना उपचारासाठी केली आर्थिक मदत

सचिन पवार                  

 रायगड ब्युरो चीफ

मो:8080092301

माणगांव: दि. २५/११/२०२२ रोजी.उद्योजक दानशूर व्यक्तिमहत्व डॉ. संजयजी सोनावणे ( संथापक,अध्यक्ष लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य.व एस.आर.एस. ग्रुप ) यांनी एका सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार मित्राची आजारपणाची माहिती मिळताच. ताबडतोब भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचार पूस केली. आणि छोटीशी मदत म्हणून २५०००/- रुपयाचा धनादेशाचा चेक दिला. तब्बेतीची आपण काळजी घ्यावी. पुढे असे ही म्हणाले की तुमच्या सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची समाजाला नितांत गरज आहे.

        दि.१९/११/२०२२ रोजी.सायंकाळी ७.३०वा. सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष मोरे हे ऍड .परेश जाधव यांच्या निवस्थानी इंदापूर येथे बसले असता. अचानक संतोष मोरे यांना ब्रेन स्टोकचा झटका आल्याने डावा हात आणि पाय हलत नसल्याचं कळताच. ऍड.परेश जाधव यांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी त्याचे ज्युनियर वकील यांना सांगून स्वतःच्या गाडीत घेऊन त्यांच क्षणी बंधू सयाजी मोरे, प्रमोद मोरे यांना माहिती दिली. आणि तिघांच्या मदतीने रोहा येथील डॉ. अशोक जाधव यांच्या दवाखान्यात तातडीने हलविण्यात आले. योग्य उपचार झाल्याने संतोष मोरे यांच्या प्रकृतीत सुधार झाला. उपस्थित बंधू सयाजी मोरे आणि गौतम मोरे यांनी डॉ. जाधव यांना सांगितले पैशाची काळजी करू नये आम्ही आहोत. त्यावेळी ही सोनावणे साहेबांनी फोन वरून तब्बेतीची माहिती घेतली.संतोष मोरे यांना

घरी आणल्याचे समजतात सोनावणे साहेब आणि रायगड जिल्याचे पत्रकार म्हणून सर्वांच्या परिचयाचे असलेले धम्मशील सावंत यांच्या सह संतोष मोरे यांची भेट घेतली. तब्बेतीची विचार पूस करून. संतोष मोरे यांना रु २५०००/- चा धनादेश पत्रकार धम्मशील सावंत यांच्या उपस्थितीत देण्यात आला. आणि पुन्हा एकदा स्वतःची काळजी घ्या असे सांगितले. मोरे यांनी यावेळी पत्रकार धर्मशील सावंत, ऍड, परेश जाधव,डॉ, संजय सोनावणे,सयाजी मोरे, प्रमोद मोरे तसेच उपस्थित मान्यवराचे आभार व्यक्त केले.