३ डिसेंबरला आंबेडकराईट नेशर या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार “विसरलास माझ्या भीमाचा तु लढा”

३ डिसेंबरला आंबेडकराईट नेशर या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार "विसरलास माझ्या भीमाचा तु लढा"

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०

महामानव भारतरत्न विश्व्भूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशिक कला मंच यांनी नेहमी प्रमाणे काहीतरी नवीन काहीतरी प्रबोधनात्मक समाजासाठी आणले आहे , शिक्षण हा अनेकांच्या आवडीचा तर अनेकांच्या अडचणीचा विषय बनला आहे तर काहींसाठी ओझं आणि काहींसाठी सोयीचं, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात शालेय शिक्षणाला अनन्य महत्व दिले आहे किंबहुना त्यांनी शिक्षणाला त्यांच्या वैचारिक आंदोलनाचा केंद्र बिंदू मानले होते, पण तेच शिक्षण आज खाजगी झाले आहे महाग झाले आहे गरिबाच्या विचारा पलीकडे गेले आहे आणि त्याकडे कोणाचेही लक्ष नाही काही निवडक संघटना आंदोलन करत आहेत, बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर शिक्षण घेतले त्याच शिक्षणावर आज गदा आली आहे याच गोष्टीवर भाष्य करणारे एक प्रबोधनात्मक गीत घेऊन आलो आहोत *विसरलास माझ्या भीमाचा तु लढा* गाण्याचे बोल आणि संगीत *कुंदन जाधव* यांचे असून, या गाण्याला सुरसाज चढवला आहे प्रख्यात गायक मा. *रवींद्रजी साठे* यांनी गाण्याचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक *विजयजी सातघरे* यांनी केले आहे तर कलाकार *राजेश चंद्रकांत उके, नेहा सैदाणे, निनाद सुतार* आणि अन्य कलाकार यांनी अगदी गाण्यात जीव ओतला आहे, संगीत संकलन *सुशील पेंढारी* यांचं असून प्रशिक कला मंच यांनी आवाहन केले आहे कि हा प्रबोधनाचा मेवा विचारपूर्वक स्वीकार करावा बाबासाहेबांच्या लढ्याला समजावे , हे गाणे महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात जावे यासाठी आपण समाज म्हणून समीक्षक म्हणून या गाण्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात सदर गाणे दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी *आंबेडकराईट नेशन* या युट्युब चॅनल वर प्रदर्शित होत असून नक्कीच या चॅनल ला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नये हे आवाहन आम्ही करत आहोत… जय भीम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here