Home latest News चित्रफीत बनवून 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक. तीन महिलांसह पाच जणांविरूध्द...

चित्रफीत बनवून 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक. तीन महिलांसह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

66

चित्रफीत बनवून 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक.तीन महिलांसह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर,३० नोव्हेंबर: चित्रफीत बनवून ती प्रसारित करण्याची धमकी देत येथील एका उच्चपदस्थ अधिकार्‍याकडे 50 लाखाच्या खंडणीची मागणी करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी जेरबंद केले. या प्रकरणी आरोपी सादीक खॉन, झिबल भारसाखरे यांच्यासह तिन महिला साथीदारंविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी येथील एका उच्चपदस्थ अधिकार्‍याला काही व्यक्तींनी संगनमत करून सदनिकेत बोलावले व एका महिलेसोबत छुपा कॅ मेर्‍यातून चित्रफीत तयार केली. त्यानंतर काही दिवसांनी ती चित्रफीत त्या अधिकार्‍याला पाठवून ती प्रसारित करण्याची धमकी देवून 3 लाख रुपयांची खंडणी वसूल केली. त्यानंतर पुन्हा खंडणी वसुल करण्याची लालसा निर्माण झाल्याने ती चित्रफीत एका अनोळखी व्यक्तीस पाठवून त्याच्यामार्फत त्या अधिकार्‍याकडे आणखी 50 लाख रुपयाच्या खंडणीची मागणी करणे सुरू केले. अधिकार्‍याने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्याने अनोळखी व्यक्तीने त्यांच्या कार्यालयात जावून त्यांच्याकडून 5 लाख रुपयांचा धनादेश व काही नगदी रक्कमेची मागणी केली. याबाबतची तक्रार त्या अधिकार्‍यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली. 

या तक्रारीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 29 नोव्हेंबर रोजी सापळा रचून खंडणी मागणार्‍या सादीक खॉन रसिक खॉन पठाण या आरोपीला अधिकार्‍याकडून 30 हजार रुपये रोख व 5 लाख रुपयाचा धनादेश घेताना रंगेहात पकडले व विचारपूस केली असता, त्याने अन्य आरोपींची नावे सांगितली. त्यानुसार, आरोपी सादीक खॉन व झिबल भारसाखरे व त्यांच्या इतर तिन महिला साथीदारांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात कलम 384, 385, 34 भादंविप्रमाणे खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोयर व संदीप कापडे, पोलिस उप निरीक्षक अतुल कावळे, आदींनी केली.