Home latest News बंद पडलेली मुरपार खाण पुन्हा सुरू होणार

बंद पडलेली मुरपार खाण पुन्हा सुरू होणार

120

बंद पडलेली मुरपार खाण पुन्हा सुरू होणार

त्रिशा राऊत

नागपूर ग्रामीण प्रतिनिधीं 

मो 9096817953

नागपूर ( उमरेड) : – बंद पडलेली मुरपार खाण पुन्हा सुरू होईपर्यंत वेकोली उमरेड परिसरातील कर्मचाऱ्यांची उमरेड परिसरात समाविष्ट करावे, या मागणीसाठी बुधवार दि.30/11/2022 रोजी सकाळी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये येण्याच्या बहाण्याने ऑगस्ट 2022 मध्ये कोळसा खाण बंद करण्यात आली, यामुळे 400 कामगारांवर स्थलांतराची टांगती तलवार होती.अचानक झालेल्या या निर्णयामुळे येथील लोकांमध्ये रोष असून त्यांच्या मुलाचं शिक्षण घर गृहस्ती अशे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आहे यासर्वांचं रोष म्हणून त्यांनी याविरोधात आंदोलन केले या आंदोलनाला समर्थन देण्या करता आंदोलन ठिकाणी पोहोचलो व आंदोलकांशी चर्चा करून कर्मचाऱ्यांची बदली थांबवून त्यांना उमरेड गोकुळ पिरावा ह्या खदान मध्ये समाविष्ट करण्यन्याची विनंती केली.