Spotlight: प्रदूषण नियंत्रण काळाची गरज

134

Spotlight: प्रदूषण नियंत्रण काळाची गरज

रमेश लांजेवार

मो: 992169077                      

औद्योगिक क्षेत्रासह संपूर्ण क्षेत्रातील प्रदूषणावर नियंत्रण असने अती आवश्यक आहे.औद्योगिक तसेच वैयक्तिक पातळीवर प्रदूषणाने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडल्याचे दिसून येते.याचा विपरीत परिणाम मानव, पशु-पक्षी,जीव-जंतु, जीवसृष्टी, नैसर्गिक संसाधने, आणि हवामानावर होत आहे.2 डिसेंबर 1984 च्या रात्री भोपाळ जवळील युनियन कार्बाईडच्या कारखान्यातून विषारी वायू गळती होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले.हा दिवस भारतसह जगासाठी काळीमा फासणारा ठरला.या दुर्घटनेची आठवण विशेषतः औद्योगिक क्षेत्रासाठी आणि यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी सर्वांनीच काळजी घ्यावी म्हणून 2 डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून पाळला जातो.

जगातील औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाशी संबंधित दुर्घटनांमध्ये भोपाळ वायू दुर्घटना सर्वात भीषण आणि महाभयानक होती.अशाच प्रकारच्या दोन घटना अमेरिकेतील थ्री माईल आयलॅड (1979) आणि रशियातील चेर्नोबिल (1986) या औद्योगिक क्षेत्रातील भयावह घटना घडल्या होत्या.म्हणजेच पृथ्वीसह संपूर्ण जीवसृष्टीला प्रदूषण विनाशाकडे नेतांना दिसत आहे.मानव हा बुध्दीजीवी प्राणी आहे त्यामुळे मानवच  प्रदूषणावर नियंत्रण ठेवु शकतो.नद्यांच्या काठावर मानवी संस्कृती विकसित झाली.पुढे त्या मानवाच्याच साक्षीने त्या-त्या पध्दतीने सांस्कृतिक धरोहर घोषित करण्यात आली.परंतु ज्या नद्यांच्या काठावर मानवाने आपले ठीकाण बनवीले त्या नद्यांमध्ये दुषीत पाण्याचा लोंढा आपल्याला दिसुन येतो.पाण्याच्या दृष्टीकोनातून नद्यांच्या अवतीभवती मोठमोठी गावे वसायची व त्या नद्यांच्या पाण्याचा उपयोग शेतीच्या कामासाठी व पीण्याच्या पाण्यासाठी केला जात असे.परंतु आता परीस्थिती बदलेली दिसून येते.सध्याच्या परिस्थितीत नद्यांच्या अवतीभवती मोठमोठी औद्योगिक वसाहत पहायला मिळते.याच औद्योगिक क्षेत्रातील दुषीत पाणी नदीत सोडल्या जाते.त्यामुळे आपल्याला आजही अनेक मोठमोठ्या नद्या प्रदुषणाचा मार झेलतांना दिसतात आणि यामुळे त्यांच्या आजूबाजूचा संपूर्ण परीसरात प्रदूषित झालेला दिसुन येतो.

प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सर्वेमध्ये असे लक्षात आले की देशातील प्रमुख नद्यांच्या 150 टापू प्रदूषीत असल्याचे सांगितले आहे.म्हणजेच नदि-नाले,तलाव, हवेतील वातावरण हे संपूर्ण प्रदुषणाकडे मोठ्या प्रमाणात वाटचाल करताना दिसत आहेत.याला मानवाने रोखले पाहिजे.आज भारताची राजधानी दिल्ली प्रदुषणाचे माहेरघर बनली आहे.त्यामुळे प्रदूषणाच्या बाबतीत भारताची चिंता दिवसेंदिवस वाढतच आहे.वाढत्या प्रदुषणाचे मुख्य कारण म्हणजे वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण, जंगलकटाई, सांडपाणी इत्यादींमुळे आज पृथ्वीतलावरील संपूर्ण जीवसृष्टीचे जगने कठीण झाले आहे.परंतु 2 डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस या निमित्ताने सर्वांनीच प्रदूषणावर नियंत्रण आणण्याचा संकल्प केला पाहिजे.

देशातील शहरीकरण रोखने, औद्योगिकरणावर नियंत्रण ठेवणे व देशातील जंगलतोड थांबवून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हायला पाहिजे.तेव्हाच आपल्याला प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात यश प्राप्त होईल.