चंद्रपूर – ट्रॅक्टर व कारचा भीषण अपघात, चार मित्रांचा मृत्यू

चंद्रपूर:- चंद्रपूर-मूल मार्गावर अजयपूर येथे एका ट्रॅक्टरला भरधाव कारने धडक दिली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला असून कारमधील चार जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतकांमध्ये 2 मुलं आणि 2 मुलींचा समावेश असून हे सर्व मूल येथील प्रतिष्ठित व्यापारी घरातील आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.

बर्थडे पार्टीवरुन घरी येताना कारला भीषण अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून वाढदिवस असलेला मित्र या अपघातातून वाचला, मात्र डोळ्यांदेखत चार मित्रांचे मृत्यू पाहण्याचा वेळ त्याच्यावर आली. दर्शना उधवाणी, प्रगती निमगडे, मोहम्मद अमन आणि स्मित पटेल.हे योग गोगरी चा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे  काल रात्री चंद्रपुर मार्गावरील एका हॉटेल मध्ये आले होते. रात्री उशिरा परत जाताना एक ट्रॅक्टर अचानक शेतातून मुख्य मार्गावर आला. त्यावेळी भरधाव असलेल्या कारने ट्रॅक्टरला धडक दिली. या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर भागात काल रात्री हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे. हे सर्व मूल येथील प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबातील आहेत

 

अपघातात दर्शना उधवाणी 25, प्रगती निमगडे 24, मोहम्मद अमन 23 आणि स्मित पटेल 25 या चौघांना प्राण गमवावे लागले. तर बर्थडे बॉय योग गोगरी 23 हा अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर उपचार आहेत. घरातील तरुण पोरांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मूल शहरात शोकाकुल वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here