Home latest News विक्रोळीतील वैभव विद्यालय शाळेत लॅपटॉपचे वितरण

विक्रोळीतील वैभव विद्यालय शाळेत लॅपटॉपचे वितरण

76

विक्रोळीतील वैभव विद्यालय शाळेत लॅपटॉपचे वितरण

संजय भोईर

१८ डिसेंबर, विक्रोळी:वैभव विद्यालया, विक्रोळी या अडतीस वर्षे जुन्या असलेल्या मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आर्यन माऊंट आणि नवनीत एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहा लॅपटॉपचे नुकतेच वितरण करण्यात आले आहे. सदरच्या कार्यक्रमासाठी श्री. अनुज कपूर, श्रीमती शर्लीन जॅकसन, श्रीमती ज्वेन पेट्टीवे, श्री. रूमी मिस्ट्री आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शाळेच्या विश्वस्त वर्षा हांडे-यादव यांनी या प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व आभार मानले. श्री. प्रतीक मनोहर यांनी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना लॅपटॉप मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले .संगणक युगात लॅपटॉपमुळे गोर गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळण्यास मदत होणार आहे.