Home latest News महाड पंचायत समिती कर्मचाऱ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

महाड पंचायत समिती कर्मचाऱ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

73

महाड पंचायत समिती कर्मचाऱ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड :- महाड औद्योगिक क्षेत्रातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवरील अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून नुकतीच एका नवीन अपघाताची यामध्ये भर पडली आहे.मंगळवार दिनांक 27 डिसेंबर रोजी रात्री 9 :00 चे सुमारास टेमघर गावाच्या हद्दीतील कुसगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने एका मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.महादेव शिवराम मोरे वय – 48 रा.बिरवाडी – कुंभारवाडा,मूळ रा.वाकी-खरकवाडी असे या मृत्यू व्यक्तीचे नाव असून ते महाड पंचायत समिती येथे शिपाई म्हणून कार्यरत होते. रात्री नऊचे सुमारास महादेव मोरे हे आपल्या ताब्यातील मोटार सायकल क्रमांक MH -06 -BQ -3537 चालवीत महाडकडून बिरवाडी येथील आपल्या घरी जात असताना हा अपघात घडला असल्याचे कळते.

आद्योगिक क्षेत्र पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र बिरवाडी येथे शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची अपघाती मृत्यू अशी नोंद अशी करण्यात आली असून अपघातास कारणीभूत असणाऱ्या अज्ञात वाहनाचा कसून शोध सुरू आहे.