माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे सुधाकर नारायण शिपूरकर व गणेश यशवंत वाघरे स्कूलचे क्रीडा स्पर्धा व वार्षिक स्नेहसमेलन संपन्न
सचिन पवार
रायगड ब्युरो चीफ
मो: 8080092301
रायगड :-माणगांव येथील माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे सुधाकर नारायण शिपूरकर व गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मेडीयम स्कूल चे वार्षिक क्रीडा स्पर्धा मान्यवर माणगांव पोलीस स्टेशनं चे उपपोलीस निरीक्षक मा. श्री.गायकवाड साहेब याच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम सोहळा पार पडला यावेळी उपपोलीस निरीक्षक मा. श्री.गायकवाड साहेब यांनी विद्यार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच वार्षिक स्नेहसंमेलन वेळी सुधाकर नारायण शिपूरकर व गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मेडीयम स्कूल ची प्रथम दिवसी महाराष्ट्र पोस्को स्टील चे एच आर मॅनेजर कुलदीप पुरंदरे यांनी दीप प्रज्वलन करून स्नेह संमेलन चे उदघाटन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.त्याचप्रमाणे विद्यार्थी यांनी ईशस्तवन व स्वागत गीत गायले, व शिपूरकर स्कूल च्या प्रिन्सिपल मनीषा मोरे यांनी प्रास्ताविक, पाहुण्यांचे स्वागत, सत्कार समारभ, बक्षीस वितरण सोहळा, मनोगत तर दुसऱ्या दिवसी माणगांव चे डॉ. संजय सोनावणे यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी डॉ. सोनावणे यांनी माणगांव शिक्षण प्रसारकं मंडळाचे सुधाकर नारायण शिपूरकर स्कूल ला ६२ हजार रुपये चे मायक्रोस्कोप ,१0 कॉम्पुटर दान केले तसेच या वर्षी संस्थेला एक लाखाची देणगी स्वरूपात वर्गणी दिली.
त्याच प्रमाणे डॉ. सोनावणे यांनी हे ही सांगितले की माणगांव शिक्षण प्रसारकं मंडळाला दर वर्षी काही ना काही माझ्या कडून देणार असे आस्वासन दिले आहे.ही संस्था माझी असून या कॉलेजचा विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे.अशोक दादा साबळे यानी मला जे ज्ञान व मार्गदर्शन दिले ते प्रत्येकाशात मी उतरवणार आहे . तसेच त्यांनी दिलेली शिकवण या पुढेही सुरु करणार आहे. डॉ. उद्योजक संजय सोनावणे यांनी दिलेल्या देणगी आणि वारंवार कार्यक्रमासाठी माणगांव शिक्षण आर्थिक मद्दत केल्या बद्दल मंडळाचे अध्यक्ष ऍड. राजीवजी साबळे यांनी आभार व्यक्त केले. स्कूल कमिटी सेक्रेटरी कृष्णाभाई गांधी, नितीन बामुगडे, नरेंद्र गायकवाड, स्नेह ओसवाल, प्रणाली शिपूरकर, संगीता शेठ, करुणा देसाई, स्मिता बोबले, निलांबरी गायकवाड शिपूरकर स्कूल च्या प्रिन्सिपल मनीषा मोरे, अशोकदादा साबळे विद्यालय चे मुख्याध्यापक डी. एम जाधव, उप मुख्याध्यापक चंद्रकांत जानराव कमिटी मेंबर, स्कूल कमिटी शिक्षक व सिक्षकेत्तर कर्मचारी या स्नेह संमेलनाला उपस्थित होते. दोन वर्षाच्या लोकडावून नंतर या वर्षी दि.२७/२८ डिसेंबर 2022/23 च्या कार्यक्रमाला मोठया संख्येने पालकांची गर्दी पाहायला मिळाली.