माणगांव येथील महालक्ष्मी कॉम्प्लेक्स मध्ये एका ३४ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या

52

माणगांव येथील महालक्ष्मी कॉम्प्लेक्स मध्ये एका ३४ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव :-माणगांव तालुक्यातील उतेखोल वाडी येथे असणाऱ्या महालक्ष्मी कॉम्प्लेक्स मध्ये काल दि.४ जानेवारी २३ रोजी रक्ताच्या टिपक्याची डागं आढळून आल्याची घटना ताजी असून त्याचा तपास अद्याप लागला नाही त्याच कॉम्प्लेक्स मध्ये एका ३४ वर्षीय इसमाने गळफास लावल्याची घटना समोर आली आहे.महालक्ष्मी कॉम्प्लेक्स मधील बिल्डिंग नं,२ रूम नं ३०१ मध्ये तिसऱ्या मजल्यावर एका विवाहित इसमाने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडल्याने माणगांव शहरात सर्वीकडे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार माणगांव उतेखोल वाडी येथील महालक्ष्मी कॉम्प्लेक्स बिल्डिंग क्र,३ ऐ विंग व बी विंगच्या टेरेस च्या जिन्यामध्ये त्याच प्रमाणे उतेखोल वाडी निजामपूर रोड रस्त्यावर रक्ताचे टिपके आढळून आले आहेत तर दुसऱ्या दिवसी बिल्डिंग क्र, दोन मध्ये राजेंद्र सुभाष जाधव वय वर्ष ३४ या विवाहित तरुणाने आज दि.५ जानेवारी रोजी दुपारी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच माणगांव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सदरचे प्रेत माणगांव येथील उपजिल्हा रुग्णालय शवविच्छनेसाठी आणले या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून दाखल करण्यात आले असून अधिक तपास माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस हे करीत आहेत.