अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल असून पुढील उपचार सुरू आहेत.

अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात,

चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल असून पुढील उपचार सुरू आहेत.

अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल असून पुढील उपचार सुरू आहेत.

हिरामण गोरेगावकर

8 जानेवारी 2023, 3:50
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. पालघरच्या महालक्ष्मीजवळ वॅगनआर कारला भीषण अपघात झाला.
कारचा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी आहेत.
मृत्यूमध्ये एका चिमुकल्याचाही समावेश आहे. जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल असून पुढील उपचार सुरू आहेत.

अपघातातील मृतांची नावे

1.नरोत्तम छना राठोड (वय 65 वर्ष)

2.केतन नरोत्तम राठोड (वय 32 वर्ष)

3.आर्वी दीपेश राठोड (वय एक वर्ष)

अपघातातील जखमींची नावे

1. दीपेश नरोत्तम राठोड (वय 35 वर्ष) चालक

2. तेजल दीपेश राठोड (वय 32 वर्ष)

3. मधु नरोत्तम राठोड (वय 58 वर्ष)

4. स्नेहल दीपेश राठोड (वय अडीच वर्ष)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here