Home latest News मुबंई गोवा महामार्गावर धरणाची वाडी येथे वॅगनारणे घेतला पेट

मुबंई गोवा महामार्गावर धरणाची वाडी येथे वॅगनारणे घेतला पेट

76

मुबंई गोवा महामार्गावर धरणाची वाडी येथे वॅगनारणे घेतला पेट

मुबंई गोवा महामार्गावर धरणाची वाडी येथे वॅगनारणे घेतला पेट

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-मुंबई गोवा हायवे माणगांव तालुक्यातील इंदापूर धरणाची वाडी गावाजवळ सोमवार दि.9 जानेवारी 2023 रोजी रात्री 8 च्या सुमारास मुबंई दिशेने गोवा राष्टीय महामार्गवरून दापोली येथे जात असलेल्या एक सफेद कलरची वॅगणार कार क्र.03 सी पी.7898 ही कार धरणाची वाडी येथील आल्यानंतर या गाडीच्या समोरील बाजूस इजिन मधून अचानक धूर आल्यामुळे चालकाने ही गाडी रस्त्याच्या एका बाजूला उभी करून खाली उतरून बघत असतना या कारने अचानक पेट घेतल्याने ही वॅगनार काही श्रणात पूर्णपणे जळून खाक झाली असून या गाडी मध्ये असलेली मुळ कागदपत्र जळून खाक झाली आहेत.

फिर्यादी मन्सूर अहमद अब्दुल जब्बार सिद्धीकी वय वर्ष 43 व्यवसाय टूर अँड ट्रॅव्हल्स राहणार रूम नं 401 कृष्णा अकेड प्लॉट्स 03 सेक्टर 12 तळोजा फेज 01 नवी मुंबई यांनी त्वरित ही खबर माणगांव पोलीस ठाण्याचे पी आय राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास पोलीस दोंडऊळकर हे करीत आहेत.