Home latest News माणगांव तालुक्यात आढलला एका अज्ञात महिलेचा मृतदेह

माणगांव तालुक्यात आढलला एका अज्ञात महिलेचा मृतदेह

68

माणगांव तालुक्यात आढलला एका अज्ञात महिलेचा मृतदेह

माणगांव तालुक्यात आढलला एका अज्ञात महिलेचा मृतदेह

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-माणगांव तालुक्यातील उतेखोल गावच्या हद्दीतील राईजिंग रेसिडेन्सी च्या पाठीमागे जगलं भागात दि.14/1/23 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची खबर माणगांव पोलीस ठाण्यात फिर्यादी नीलाबाई निलू चव्हाण वय वर्ष 45 व्यवसाय मोल मजुरी रा. दत्त नगर ता.माणगांव जि.रायगड या महिलेने माणगांव पोलीस ठाण्यात दिली असता त्या ठिकाणी माणगांव पोलीस दाखल झाले .

मिळालेल्या माहितीनुसार माणगांव येथील या महिलेचा मृतदेह उतेखोल गावच्या जगलं भागात रायजिंग रेसिडेन्सी पाठीमागे या महिलेचा मृतदेह आढळून आलं आहे या महिलेचा वय अंदाजे 50 ते 55 या घरात असून ओळख पटली नसून 05/2023 सी आर पी सी कलम 174 प्रमाणे पुढील तपास माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली सह पोलीस निरीक्षक लहागे, सह फौंज. मगर हे करीत आहेत.