Home latest News टायगर ग्रुप आलापल्लीच्या सामाजिक कार्याचा गौरव..

टायगर ग्रुप आलापल्लीच्या सामाजिक कार्याचा गौरव..

90

टायगर ग्रुप आलापल्लीच्या सामाजिक कार्याचा गौरव..

टायगर ग्रुप आलापल्लीच्या सामाजिक कार्याचा गौरव..

ता. प्रतिनिधी /महेश बुरमवार

आलापल्ली : ग्रामीण भागातील शोषित, पीडित, वंचितांच्या समस्यांना घेऊन कार्य करीत असल्याबद्दल टायगर ग्रुप आलापल्ली सामाजिक संस्थेच्या सदस्यांचा आलापल्ली ग्रामपंचायत तर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनात २०१६ साली टायगर ग्रुपची स्थापना आलापल्ली येथे करण्यात आली होती . गेल्या ७ वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात गरजू लोकांना मोफत रुग्णवाहिका सेवा व उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना रक्तपुरवठा ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनी सायकल वाटप गरीब लोकांना ब्लँकेट वाटप आणि पुर – परिसथितीत लोकांना तात्काळ मदत अशी अनेक सामाजिक कामे टायगर ग्रुपच्या माध्यमातून केली जात आहेत. ग्रामीण भागातील जनसामान्य जनतेसाठी टायगर ग्रुप देवदूत ठरले आहे त्यांचा कार्याची दखल घेऊन ग्रामपंचायत आलापल्ली तर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उप वन संरक्षक टोलिया साहेब ,ग्रामविकास अधिकारी मस्के साहेब , आलापल्ली रुग्णालय डॉ. उईके मॅडम, आलापल्ली ग्रा. प.सरपंच शंकर भाऊ मेश्राम व ग्रापंचायत सदस्य सोमेश्वर भाऊ रामटेके,मनोज भाऊ बोलूवार ,पुष्पा ताई अलोणे व सर्व ग्रां. प. सदस्य उपस्थित होते.