पार्श्व जैन तीर्थधाम पोटणेर येथे प. पु. प्रशांत विजय महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड :-कोकणातील तसेच महाराष्ट्रातील एकमेव असे जैन समाजातील श्री.कोकण पार्श्व जैन तीर्थधाम हे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोटणेर येथे वसलेले असून या श्री पार्श्व जैन तीर्थधाम मंदिराला महाराष्ट्रातुन तसेच इतर राज्यातील व देशभरातील जैन समाजातील भक्तगण भेट देत असतात अतिशय सुंदर आणि शांततेचे हे ठिकाण असून या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताला येथे आल्यावर समाधान वाटत असते.

अशाच प्रकारे या श्री कोकण पार्श्व जैन तीर्थधाम मंदिराचे गुरू महाराज प,पू.मुनिराज श्री.प्रशांत विजयजी महाराज साहेब यांची ३ डिसेंबर २०१३ या वर्षी पोटणेर येथे काही समाज कर्मठानी हत्या केली होती त्यामुळे कोकणातील जैन समाज बाधवांना मध्ये मोठी दुःखद घटना घडून आली होती.सर्वत्र कोकणातील जैन समाज यावेळी एकवटून आला होतो प.पू.मुनिराज श्री.प्रशांत विजय महाराज हे मृत्यू झाले असेले तरी ते आपल्यातून गेले नाहीत ते आपल्यातच आहेत आपल्याला ते मार्गदर्शन करत आहेत

एवढे अथांग प्रेम महाराजाना विषयी आज देखील कोकण रायगड मधील जैन समाजबाधवांन मध्ये दिसून येत असून जैन समाजबाधवानी श्री.कोकण पार्श्व तीर्थधाम पोटणेर या ठिकाणी प.पू.मुनिराज श्री.प्रशांत विजयजी महाराज यांचे स्वतंत्र असे भव्य दिव्य मंदिर उभारून त्या मध्ये उभी सुंदर अशी गुरूमूर्तिची रविवार दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी प्राण प्रतिष्ठा केली आहे.

 

 

       या मूर्ती प्रतिष्ठा कार्यक्रमास कोकण रायगड जिल्हातील माणगांव, इंदापूर, कोलाड,रोहा,नागोठणे,पाली,आलिबाग,श्रीवर्धन,म्हसळा, बोर्ली, रत्नागिरी,मधील बहुसंख्य असे जैन बांधव उपस्थित होते तसेच आचार्य गुरू रश्मीराजसुरजी  महाराज यांची देखील उपस्थित प्राथनिय होती यावेळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते व श्री कोकण पार्श्व जैन तीर्थधाम मंदिर कंमिटीचे अध्यक्ष केवलशेठ जैन, उपाध्यक्ष गणेशमलशेठ जैन,निहालचंदजीशेठ जैन,हस्तीमलशेठ जैन, मनोज जैन,विलासशेठ जैन,अमृतशेठ जैन,मनोजशेठ जैन,शांतीलालशेठ जैन,प्रवीणशेठ जैन,चंदुशेठ जैन, व महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गीत गायनाच्या सुर मैयफिलीत आनंदाने हा कार्यक्रम सुंदर रित्या पार पडला.      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here